HW Marathi
राजकारण

वनखात्याला अवनी वाघिणीला ठार मारण्याची हौस नव्हती !

मुंबई | वनखात्याला अवनी वाघिणीला ठार मारण्याची हौस नव्हती, असे वक्तव्य वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. त्याचप्रमाणे माझा राजीनामा मागण्याचा अधिकार इतर कोणालाही नसून तो फक्त भाजप अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच असल्याचे देखील सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांना उद्देशून म्हटले आहे. नरभक्षक वाघीण अवनी हिला वन खात्याकडून ठार करण्यात आल्यानंतर वन खात्यावर सर्वच स्तरावरून विशेषतः राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली होती.

अवनी वाघिणीला बेशुद्ध करुन पकडणे शक्य होते मात्र तिला ठार करण्यात आले. तसेच त्यासाठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या शार्प शूटरची नियुक्ती करण्यात आली, असा आरोप केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी ट्विट करून केला होता. याचसोबत मुनगंटीवार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी देखील मनेका गांधी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केल्याचे समजते.

Related posts

बाप कोण, पोरे कोण काहीच कळत नाही !

News Desk

शिवसेनेत हिंमत असेल तर मुंबईत ओवेसींना अडवून दाखवावे !

News Desk

विधानपरिषद सदस्य आणि महामंडळ अध्यक्षपदांची रिपाइंची मागणी

News Desk