HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

गौतम गंभीरचा भाजपमध्ये प्रवेश

मुंबई | भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज गौतम गंभीर याने आज (२२ मार्च) भाजपमध्ये प्रवेश केला आहे. केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या उपस्थितीत गौतम गंभीर याने भाजपमध्ये प्रवेश केला आहे.  गेल्या अनेक दिवसांपासून गंभीरच्या भाजप प्रवेशाची चर्चा होती. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली आणि केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांच्या उपस्थितीत गौतम गंभीरने भाजपप्रवेश केला आहे.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाला प्रभावीत होऊन मी भाजपमध्ये प्रेवश केला आहे. मला भाजपसारखा मंच मिळाल्यामुळे मी स्व:ताल धन्य समजतो.” भाजपत प्रवेशानंतर गौतम मंभीरने प्रतिक्रिया दिली. गंभीर हा नवी दिल्लीतून लोकसभा निवडणुकीसाठी उभा राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. यापूर्वी २०१४ साली लोकसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. त्यावेळी सातपैकी सात जागांवर भाजपने विजय मिळवला होता. आता भजपला वाटत आहे की, यावेळी काही जागांवरील उमेदवारांना विरोध होऊ शकतो. त्यामुळे आता काही जागांवर नवीन उमेदवार देण्यासाठी भाजप प्रयत्नशील असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Related posts

मी चौकीदार नाही तर जन्मत:च शिवसैनिक !

News Desk

…नाहीतर त्यांनी माझ्या नेतृत्त्वाखाली काम करावे | रामदास आठवले

News Desk

“राम मध्यस्थांच्या तावडीत”, सर्वोच्च न्यालयाच्या निर्णयावर शिवसेनेने व्यक्त केली नाराजी

News Desk