नवी दिल्ली | दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते मदनलाल खुराना यांचे शनिवारी मध्यरात्री राहत्या घरी निधन झाले. खुराना ८२ वर्षाचे होते. २०११ पासून त्यांना ब्रेन स्ट्रोकचा त्रास होत होता. ब्रेन स्ट्रोकमुळे ते कोमामध्ये होते. दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. खुराना यांच्या मुलगा हरिश खुराना यांनी ट्विट करून त्यांच्य निधनाची माहिती दिली. खुराणा यांच्या मुलाचे मागील महिन्यात निधन झाले होते. खुराना हे १९९३ ते १९९६ या काळात दिल्लीचे मुख्यमंत्री राहिले होते. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात खुराना संसदीय कार्यमंत्री आणि पर्यटन मंत्रीही राहिले होते. दिल्लीमधून ते चारवेळा संसदेवर निवडून गेले होते.
खुराना यांच्या निधनाची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाहिली श्रद्धांजली. तसेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि भाजपच्या नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली ट्विट करून श्रद्धांजली वाहिली.
Anguished by the passing away of Shri Madan Lal Khurana Ji. He worked tirelessly for the progress of Delhi, particularly towards ensuring better infrastructure. He distinguished himself as a hardworking and people-friendly administrator, both in the Delhi government and Centre.
— Narendra Modi (@narendramodi) October 28, 2018
दिल्ली के पूर्व मुख्यमंत्री और भाजपा के वरिष्ठ नेता मदनलाल खुराना जी के निधन का दुःखद समाचार प्राप्त हुआ। खुराना जी एक आदर्श स्वयंसेवक, एक समर्पित विद्यार्थी परिषद कार्यकर्ता व जनसंघ और भारतीय जनता पार्टी के एक मजबूत स्तम्भ के रूप में सदैव याद किये जायेंगे। pic.twitter.com/TG1I1fHQtT
— Amit Shah (@AmitShah) October 27, 2018
मदनलाल खुराना यांचा अल्प परिचय
खुराना यांचा जन्म १५ ऑक्टोबरला पाकिस्तानच्या पंजाबमधील लयालपूर फैलसाबादमध्ये झाला होता. भारत-पाकिस्तान फाळणीनंतर लयालपूर पाकिस्तानचा भाग झाला आणि फैसलाबाद असे त्याचे नामकरण झाले. खुराणा १२ वर्षाचे असताना त्यांचे कुंटुबीय दिल्लीत आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून भाजपात आलेल्या खुराणा यांनी राजस्थानच्या राज्यपाल पदाची धुरा देखील सांभाळली होती. मदनलाल खुराणा १९९३ ते १९९६ या काळात दिल्लीचे मुख्यमंत्री होते. अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात ते केंद्रीय मंत्री होते. प्रदीर्घ राजकीय कारकीर्द लाभलेल्या खुराना यांना २००१ मध्ये राजस्थानच्या राज्यपालपदी नेमण्यात आले. ते भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्षही होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.