HW News Marathi
राजकारण

राज्यातील मोठे प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार ‘ब्र’ सुद्धा काढत नाहीत! – सुभाष देसाई

मुंबई | “राज्यातील मोठे प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार ‘ब्र’ सुद्धा काढत नाहीत”, असा सवाल  शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी शिंदे-फडणवीस सरकारला केला आहे. वेदांता-फॉक्सकॉन आणि बल्क ड्रग्ज पार्क हे दोन महत्वाचे प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला आहे. यानंतर सी-२९५ या मालवाहू विमानांची बांधणी करणारा ‘टाटा एयरबस प्रकल्प’ (Tata Air Bus Project) राज्यातून महत्वाचे प्रकल्प गुजरातला गेला आहे. या मुद्यावरुन सुभाष देसाई यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला मुलाखतीदरम्यान पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरले. हा ‘टाटा एयरबस प्रकल्प’ 22 हजार कोटी रुपयांचा असून 30 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

 

सुभाष देसाई म्हणाले, “गेल्या तीन महिन्यात हा तिसरा धक्का महाराष्ट्राला बसला आहे. याआधी वेदान्त फॉक्सकॉन आणि बल्क ड्रग्ज पार्क हा प्रकल्प गुजरातला स्थापन करण्याची घोषणा झाली. हे दोन मोठे जबरस्त धक्का महाराष्ट्रला बसला. तर आता तिसरा धक्का हा ज्यांची बोलणी चांगल्याप्रकरे चालली होती. सर्व चर्चेची प्रक्रिया सुरू असताना हा जो टाटा आणि एयरबसचा संयुक्त प्रकल्प आहे. जी लष्कराला लागणार विमाने आहेत. हवाई दलाल लागणारी विमाने निर्मिती करण्याचे टाटा एयरबसचा संयुक्त प्रकल्पाची काल घोषणा झाली. 22 हजार कोटींची गुंतवणूक करणारा हा प्रकल्प महाराष्ट्रात यावा, यासाठी महाविकास आघाडी सरकारने खूप मोठे प्रयत्न केले. तो प्रकल्प सुद्धा गुजरातमध्ये होणार आहे. गेल्या तीन महिन्यात हे निर्णय झालेले आहेत. हा काही योगायोग आहे का?, गेल्या तीन महिन्यापूर्वीच हे सरकार बद्दलले आणि आताचे शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. यानंतर महाराष्ट्रात येऊ घातलेले जे प्रकल्प होते. आणि हे प्रकल्प दुसरीकडे म्हणजे एकाच राज्यात गेलेत. या प्रकल्पबद्दल ब्र सुद्धा काढत नाहीत. अजूनही राज्य सरकार केंद्र सरकारला सांगत नाही की, आता तरी थांबणार आहात का?,” असे अनेक सवाल उपस्थित करत त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला.

 

केंद्र सरकारचे मनसूबे पूर्ण करण्यासाठी राज्यात शिंदे-फडणवीस आणले सरकार

 

राज्यातील महत्वाचे प्रकल्प गुजरातला नेहण्यासाठी राज्यात शिंदे सरकार स्थानप झाल्याचा आरोप सुभाष देसाई यांनी केला आहे. यावर बोलताना सुभाष देसाईल म्हणाले, “राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन करण्यामागे सर्व प्रकल्प गुजरातला नेहण्याचा हा हेतू असू शकतो. जे मनसूबे भाजपच्या सरकारने स्थापन आखलेले होते. राज्यातून पळवा पळवी करण्याचे ते सुरळीत पणे कसे करता येईल.  कोणी ब्र सुद्धा काढणार नाही, असे सरकार म्हणचे आपले मंद्ये सरकार आले पाहिजे.”

 

 

 

 

 

Related posts

न्या. गोयल यांना राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या अध्यक्षपदावरून त्वरित हटवा

News Desk

येडं पेरलं अन् खुळं उगवलं, धनंजय मुंडेंची दानवेंवर जहरी टीका

News Desk

संजय राऊतांची ED कोठडी वाढणार की जामीन मिळणार?

Aprna