HW News Marathi
राजकारण

#LokSabhaElections2019 : कन्हैया कुमार बेगुसरायमधून निवडणुकीच्या रिंगणात

पाटणा | जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार बिहारच्या बेगुसरायमधून लोकसभा निवडणूक लढविणार आहे. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या तिकीटावरून कन्हैया बेगुसराय मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहे. सीपीआयचे बिहारचे अध्यक्ष सत्यनारायण सिंह यांनी ही माहिती दिली आहे.

बेगुसराय मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळाणार आहे. बेगुसरामधून भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह, राष्ट्रीय जनता दलाचे तन्वीर हसन यांच्यासोबत कन्हैया कुमार यांची तिरंगी लढत होणार आहे. काही वर्षांपूर्वी बेगुसराय हे सीपीआयचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होते. हा गढ राखण्यासाठी डाव्यांना राजदची गरज भासू लागली. त्यामुळे राजदचा समावेश असलेल्या महाआघाडीकडून कन्हैया कुमार यांना उमेदवारी मिळेल, अशी माहिती सीपीआयला होते.

 

Related posts

मोदींना विरोध करणारे सर्व एकत्र आले, तरीही त्यांचा निभाव लागणार नाही

News Desk

न्यायालयाच्या निर्णयाविरोधात आठवले जाणार सर्वोच्च न्यायालयात

News Desk

शेतकऱ्यांना खतासाठी जात विचारल्याच्या मुद्यावरून अजित पवार सभागृहात आक्रमक

Aprna