HW News Marathi
राजकारण

राणेसाहेबांवर टीका कराल तर ठाकरे घराण्याचे काळे सत्य बाहेर काढू !

मुंबई | महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार नीलेश राणे यांनी (१४ जानेवारी ) रत्नागिरीत पत्रकार परिषद घेऊन दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर नाव घेऊन गंभीर आरोप केले आहे.शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी जाहीर सभेतून केलेल्या टीकेला उत्तर देताना ‘राणे कुटुंबावरील टीका शिवसेनेने थांबवली नाही तर ठाकरे घराण्यातले काळे सत्य जाहीर सभेतून समोर आणेन’ असा इशारा निलेश यांनी दिला. शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचा मृत्यू आणि गायक सोनू निगमबाबत यावेळी निलेश यांनी खळबळजनक विधान केले.

नेमके काय म्हणाले निलेश राणे

‘आनंद दिघे यांचे काय झाले? कट कसा रचण्यात आला? त्यांचे मरण नंतर रुग्णालयामध्ये झाल्याचे कसे दाखवण्यात आले आणि हा सगळा प्रकार ज्या दोन शिवसैनिकांना सहन झाला नाही, त्या दोघांना ठार मारण्यासाठी बाळासाहेबांनी कुणाला ऑर्डर दिल्या. त्यांना कशाप्रकारे ठार मारण्यात आले, ही केस कशी दाबली गेली, हे मला ठाऊक आहे’,

‘बाळासाहेबांना सोनू निगम यांना ठार मारायचे होते. तसे अनेक प्रयत्न शिवसैनिकांनी केले. तेव्हा सोनू निगम घाबरलेले होते. परंतु, आता बाळासाहेब नसल्याने कदाचित ते यावर बोलतीलही. तुम्ही त्यांना याबाबत विचारू शकता’, असे निलेश म्हणाले.

‘बाळासाहेबांच्या कर्जतच्या फार्महाऊसवर कुणाकुणाचे मृत्यू झाले. कोण कोण त्या फार्महाऊसवर गेले. हे सगळे मी जाहीर सभेत सांगेन’, असा इशाराही निलेश यांनी दिला. ‘ठाकरे घराण्याचे अर्ध सत्य जयदेव ठाकरे यांनी कोर्टात सांगितले आहे. ते बंद खोलीत काय काय बोलले, हे मी सांगितले तर स्मारक सोडा पण ठाकरेंच्या अंगावर कपडे राहणार नाहीत. लोकच मग स्मारक होऊ देणार नाहीत’, असेही निलेश म्हणाले.

‘बाळासाहेबांबद्दल नारायण राणे यांना नेहमीच आदर राहिला. त्यांनी त्यांना वडिलांसमान मानले. त्या प्रेमापोटीच आजवर आम्ही सगळी टीका सहन केली. मात्र आता खालच्या दर्जाचे लोक तशीच टीका करू लागले, तर ती आम्ही सहन करणार नाही. माझ्यासाठी माझे राणेसाहेब महत्त्वाचे आहेत, बाळासाहेब महत्त्वाचे नाहीत’, असे निलेश म्हणाले. ठाकरे घराण्याची अब्रू वाचवायची असेल तर विनायक राऊत यांनी आजच सावध व्हावे, असा इशाराही त्यांनी दिला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राहुलजी गांधींच्या प्रतिमेला जोडे मारण्याचे आंदोलन म्हणजे हीन राजकारण! – बाळासाहेब थोरात

Aprna

मुख्यमंत्रीपदाच्या मागणीवर शिवसेना ठाम, उद्धव ठाकरे बोलण्याची शक्यता

News Desk

या सरकारला शेतकऱ्यांची काहीच पडलेली नाही !

News Desk