मुंबई | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनी विविध यात्रांचे आयोजन केले आहे. यात मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा, आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा, राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा सुरु आहेत. यात आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या आजपासून (२३ ऑगस्ट) संवाद दौरा काढणार असून या दौऱ्यातून महाराष्ट्रातील पूरपरिस्थिती, दुष्काळ, बेरोजगारी, महिला सुरक्षा, एकूणच ढिसाळ प्रशासकीय कारभार व सामान्यांप्रति सरकारी अनास्था याविषयावर जनतेशी संवाद साधणार आहेत.
पूरपरिस्थिती, दुष्काळ, बेरोजगारी, महिला सुरक्षा, एकूणच ढिसाळ प्रशासकीय कारभार व सामान्यांप्रति सरकारी अनास्था या पार्श्वभूमीवर विविध जिल्ह्यांतील बहुविध घटकांशी संवाद साधण्यासाठी खा. @supriya_sule यांचा संवाद दौरा उद्या २३ ऑगस्टपासून सुरू होत आहे. pic.twitter.com/yjQE6HtkwN
— NCP (@NCPspeaks) August 22, 2019
या संवाद दौऱ्याचा पहिला टप्पा २३ ते ३१ ऑगस्टपर्यंत असणार आहे. पहिल्या टप्प्यातील दौऱ्याती राज्यातील अहमदनगर, सोलापूर, जळगाव, नाशिक, ठाणे, नागपूर, नवी मुंबई या जिल्ह्यात सुप्रिया सुळे फिरणार आहेत. निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी पक्षातील दिग्गज नेत्यांनी शिवसेना-भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यानंतर पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये निराशा पसरली असताना संवाद दौऱ्यातून जास्तीत जास्त जनतेशी लोकांपर्यंत पोहचण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न करत आहे. यासाठी शिवस्वराज्य यात्रेनंतर सुप्रिया सुळे यांचा संवाद दौरा सुरू होणार आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.