HW News Marathi
राजकारण

महाराष्ट्रातील ‘या’ बहुचर्चित चेहऱ्यांचे भविष्य आज होणार सीलबंद

मुंबई | देशभरात आज (२९ एप्रिल) लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडणार आहे. या टप्प्यात महाराष्ट्रासह देशभरात ९ राज्यातील ७१ लोकसभा मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. महाराष्ट्रात एकूण १७ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. हा टप्पा महाराष्ट्रातील लोकसभेचा चौथा आणि अंतिम टप्पा आहे. सकाळी ८ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होईल. देशात एकूण ७ टप्प्यात मतदान पार पडणार आहे. तर २३ मे रोजी या निवडणुकांचा निकाल लागणार आहे.

महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, शिरूर, ठाणे, कल्याण, शिर्डीसह मुंबईतील सर्व मतदारसंघांसाठी या चौथ्या टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील काँग्रेसच्या उर्मिला मातोंडकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल कोल्हे, भाजपच्या पूनम महाजन, राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार, काँग्रेसच्या प्रिया दत्त अशा अनेक बहुचर्चित चेहऱ्यांचे भविष्य मतपेटीत सीलबंद होणार आहे.

लोकसभा मतदार संघ

शिवसेना/भाजप

काँग्रेस/राष्ट्रवादी काँग्रेस

नंदुरबार डॉ.हिना गावित (भाजप) के.सी.पडवी (काँग्रेस)
धुळे डॉ.सुभाष भामरे (भाजप) कुणाल पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)
दिंडोरी भारती पवार (भाजप) धनराज महाले (काँग्रेस)
नाशिक हेमंत गोडसे (शिवसेना) समीर भुजबळ (राष्ट्रवादी काँग्रेस)
पालघर राजेंद्र गावित (शिवसेना) सुरेश पडवी (काँग्रेस)
भिवंडी कपिल पाटील (भाजप) सुरेश टावरे (काँग्रेस)
कल्याण श्रीकांत शिंदे (शिवसेना) बाबाजी पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)
ठाणे राजन विचारे (शिवसेना) आनंद परांजपे (राष्ट्रवादी काँग्रेस)
मुंबई उत्तर गोपाळ शेट्टी (भाजप) उर्मिला मातोंडकर (काँग्रेस)
मुंबई वायव्य गजानन किर्तीकर (शिवसेना) संजय निरुपम (काँग्रेस)
मुंबई ईशान्य मनोज कोटक (भाजप) संजय दीना पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)
मुंबई उत्तर मध्य पूनम महाजन (भाजप) प्रिया दत्त (काँग्रेस)
मुंबई दक्षिण मध्य राहुल शेवाळे (शिवसेना) एकनाथ गायकवाड (काँग्रेस)
मुंबई दक्षिण अरविंद सावंत (शिवसेना) मिलिंद देवरा (काँग्रेस)
मावळ श्रीरंग बारणे (शिवसेना) पार्थ पवार (राष्ट्रवादी काँग्रेस)
शिरूर शिवाजीराव आढळराव पाटील (शिवसेना) डॉ. अमोल कोल्हे (राष्ट्रवादी काँग्रेस)

शिर्डी सदाशिव लोखंडे (शिवसेना) भाऊसाहेब कांबळे (काँग्रेस)
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेसने शेतकऱ्यांना बरबाद केले, पंतप्रधान मोदींची जहरी टीका

News Desk

धनंजय मुंडेंचा आज जालना, बीड जिल्ह्यात गारपीट भागाचा दौरा

News Desk

औवेसींवर ‘या’ कारणामुळे संसदेत अमित शहा भडकले

News Desk