HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

गडकरी, आंबेडकर, चव्हाणांसह दिग्गज नेत्यांनी भरले उमेदवारी अर्ज

मुंबई | लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी आपआपल्या मतदारासंघातून आज (२५ मार्च) अर्ज दाखल केला आहे. लोकसभेच्या पहिल्या टप्प्याचे मतदान ११ एप्रिलला होणार आहे. या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज हा शेवटचा दिवस आहे.  सोलापूरमधून वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसचे नेते सुशील कुमार शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहेत. तसेच नागपूरच्या रामटेकमधून केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, नांदेडमधून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षछ अशोक चव्हाण, आणि भाजपच्या आमदार प्रीतम मुंडे यांनी बीडमधून आदी दिग्गज नेत्यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

प्रकाश आंबेडकर, सुशील कुमार शिंदे आणि अशोक चव्हाण यांनी रॅली काढून शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. शिवसेना नेते युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे व शिवसेना नेते खासदार अनिल देसाई यांच्या उपस्थितीत खासदार आनंदराव अडसूळ यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. तसेच यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित होते. हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत यावेळी ‘रॅली’ काढण्यात आली व भाजपा-शिवसेना-आरपीआय युतीचे शक्तीप्रदर्शन झाले.

महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यात या सात जागांसाठी मतदान

  • वर्धा
  • रामटेक
  • नागपूर
  • भंडारा- गोदिया
  • गडचिरोली- चिमूड
  • चंद्रपूर
  • यवतमाळ
  • वाशिम

Related posts

शिवरायांच्या भूमीतले असूनसुद्धा जनतेला फसवून पवारांना झोप कशी लागते ?

News Desk

आता न्यायालय देखील म्हणते ‘चौकीदार चोर है’ !

News Desk

मतदान करणे हे आपले कर्तव्य, सर्वांनी आपले कर्तव्य बजावण्याची गरज | मोहन भागवत

News Desk