HW News Marathi
राजकारण

समृध्दी महामार्गाला राजमाता जिजाऊंचे नाव द्या !

बुलढाणा | “समृध्दी महामार्ग जिजाऊच्या पवित्र भूमीतून जात असल्याने या महामार्गाला राजमाता जिजाऊंचे नाव द्या”, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. ते बुलढाणा येथील जाहीर सभेत बोलत होते. “पंतप्रधान चौकीदार असतानाही देशातील चोर करोडो रुपये लुटून गेले आहेत. त्यामुळे मोदी कृपेने तुमच्या- माझ्या डोक्यावर १५ लाखाचे कर्ज केल्याशिवाय राहणार नाही”, असा इशाराही धनंजय मुंडे यांनी दिला आहे.

सरकारच्या कोषात तत्वत:, सरसकट हे शब्द सापडले नाहीत. परंतु हे शब्द संघाच्या पोतडीतून आले आहेत, असा टोला देखील धनंजय मुंडे यांनी लगावला आहे. ५२६ रुपयांचा मोबाईल, हेडफोन-चार्जरसह १६३६ रुपयात घेणे म्हणजे राफेल करार होय, अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी राफेलचा अर्थ सांगितला आहे. महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात शेतकऱ्यांचा मुलगा नसल्याने आज शेतकऱ्यांना संकटांना सामोरे जावे लागत आहे, असेही धनंजय मुंडे म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदी सरकार सर्जिकल स्ट्राईकचे भांडवल करते !

News Desk

चंद्रकांत पाटलांचे विठुरायाला साकडे

News Desk

आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये पवार कुटुंबातील ४ जणांची प्रतिष्ठा पणाला !

News Desk