HW Marathi
राजकारण

अखेर गोव्यात भाजपचे बहुमत सिद्ध

पणजी | गोव्यात भाजपने विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर भाजप नेते प्रमोद सावंत यांच्या मुख्यमंत्री पदावर शिक्कामोर्तब झाला आहे. विश्वासदर्शक ठरावात भाजपच्या बाजूने २० मते तर विरोधात १५ मते मिळाली आहेत. यानंतर भाजपने गोव्यात स्पष्ट असे बहुमत सिद्ध केले आहे.

प्रमोद सावंत यांनी सोमवारी (१८ मार्च) रात्री १ वाजून ४५ मिनिटांनी गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी प्रमोद सावंत यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. त्याचप्रमाणे मगो पक्षाचे सुदिन ढवळीकर आणि गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई हे दोन्ही आमदारांना उपमुख्यमंत्रीपद विराजमान होणारआहे.

Related posts

प्रांतीय अस्मितेचे जनक बाळासाहेब ठाकरेच !

News Desk

महाराष्ट्राचा विकास का घसरतो याचीच टोचणी !

News Desk

मनोहर पर्रीकर अनंतात विलीन, अंत्ययात्रेला लाखोंचा जनसागर लोटला

News Desk