HW Marathi
राजकारण

झोपलेल्या कुंभकर्णाला जागं करण्यासाठी पंढरपुरात जाणार !

मुंबई | “राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर शिवसेना आक्रमक आहे. त्यामुळेच झोपी गेलेल्या कुंभकर्णाला जागं करण्यासाठी मीच येत्या २४ तारखेला पंढरपुरात जाणार आहे”, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. “दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कोणत्या विभागात काय कामं करायला हवे याचा आढावा घेण्यात आला आहे. शिवसेने कायमच दुष्काळाच्या मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे यापुढे आमची भूमिका ‘कुंभकर्णा जागा हो’ अशी असणार आहे”, असे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले आहे.

त्याचप्रमाणे राम मंदिराच्या मुद्द्यावर देखील उद्धव ठाकरे यांनी वक्तव्य केले आहे. “अयोध्या राम मंदिर प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडे बोट दाखवणे थांबवा”, असे उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारला उद्देशून म्हटले आहे. आज उद्धव ठाकरेंनी राज्यभरातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर उद्धव ठाकरेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे.

‘राज्यातील दुष्काळी परिस्थिती दिवसेंदिवस आणखी भयंकर होत जाईल. राज्यातील दुष्काळी भागांमध्ये जाऊन जनतेशी संवाद साधून त्यांना नेमकं काय हवं आहे ते जाणून घ्या, अशा सूचना पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत,’ अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांना दुष्काळी भागाचे दौरे करण्याचे आदेश देण्यात आले असून त्यांना आक्रमक होण्याचा आदेशही देण्यात आला आहे.

Related posts

भाजपकडून अखेर माढ्यातून रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर

News Desk

२०१९ च्या लोकसभा निवणुकांमध्ये ‘हा’ असेल भाजपचा नवा नारा

News Desk

राहुल गांधींवर मानहानीचा दावा

Gauri Tilekar