HW News Marathi
राजकारण

राज्यात जनतेवर विषप्रयोग करणारे सरकारः खा. अशोक चव्हाण

औरंगाबाद | धर्मा पाटील यांनी विष प्राशन करून आत्महत्या करेपर्यंत सरकारने त्यांच्या मागण्याकडे लक्ष दिले नाही. विदर्भात कीटकनाशक फवारणी करताना ४४ शेतक-यांचा विषबाधा होऊन मृत्यू पावले मात्र सरकारच्या चौकशी अहवालात कोणीही दोषी नाही. राज्यातील सरकारच शेतक-यांवर विषप्रयोग करून त्यांचा बळी घेत आहे अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे ते औरंगाबाद येथे काँग्रेस पक्षाच्या जिल्हास्तरीय शिबीरात बोलत होते.
यावेळी बोलताना खा. चव्हाण यांनी राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांवर सडकून टीका केली. काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने गेल्या 60 वर्षात देश घडवण्याचे काम केले पण भाजप सत्तेत आल्यापासून देश तोडण्याचे काम करित आहे. भीमा कोरेगाव सारखी प्रकरणे घडवून समाजात विष पेरण्याचे काम सत्ताधारी पक्षाकडून सुरु आहे. राज्यातील आणि देशातील सरकारने खोटी आश्वासने देऊन जनतेची फसवणूक केली आहे. या सरकारने दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. शेतक-यांना कर्जमाफी देण्याऐवजी जाहिरातींवर कोट्यवधींचा खर्च सुरु आहे. बाबा रामदेवच या सरकारच खरे लाभार्थी असून खोटारडे सरकार आणि फसवणूक दमदार अशी परिस्थिती आहे. मराठवाड्यात येणा-या संस्था आणि प्रकल्प मुख्यमंत्र्यांनी इतर ठिकाणी हलवले. मराठवाड्यातल्या रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. मुख्यमंत्री आणि बांधकाम मंत्र्यांनी हेलिकॉप्टरऐवजी रस्त्याने मराठवाड्यात फिरून दाखवावे. राज्य सरकार मराठवाड्यावर अन्याय करत असून काँग्रेस कार्यकर्त्यांनी लोकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून सरकारविरोधातील संघर्ष तीव्र करावा असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी कार्यकर्त्यांना केले.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांनीही सरकारवर जोरदार टीका केली. नरेंद्र मोदी हे परदेशी कंपन्यांच्या फायद्यासाठी काम करत असून त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला संकटात टाकले आहे. ज्यांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला नाही. ज्यांनी इंग्रजांची गुलामगिरी केली ते आज आम्हाला राष्ट्रभक्ती शिकवत असून तिरंग्याला राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारण्यास विरोध करणारे आज तिरंगा यात्रा काढत आहेत हा भाजपचा ढोंगीपणा आहे असे मोहन प्रकाश म्हणाले.
राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना भाजप सरकारच्या आर्थिक धोरणांची चिरफाड करून त्यातील फोलपणा उघड केला. भाजप सरकारच्या काळात विकासदरात सातत्याने घसरण होत असून नोटाबंदी व जीएसटीच्या चुकीच्या अंमलबजावणीमुळे देशाचे तीन लाख कोटींचे नुकसान झाले असून देशाच्या अर्थव्यवस्थेवर घाला घालण्याचे काम सरकारने केले आहे .
भाजप-शिवसेना सरकारच्या काळात आत्महत्या केल्याशिवाय न्याय मिळत नाही. हे सरकार न्यायासाठी नरबळी मागणारे सरकार असल्याची घणाघाती टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. राज्यातील एकही घटक आज समाधानी नाही. शेतकरी, शेतमजूर, व्यापारी अशा सर्वच घटकांमध्ये कमालीचा असंतोष दिसून येतो आहे. सर्वसामान्यांना न्याय द्यायला हे सरकार तयार नाही. धर्मा पाटील यांनी विष प्राशन केल्यानंतरच सरकार खडबडून जागे झाले. शेतकऱ्यांपाठोपाठ व्यापारीही आत्महत्या करीत असून,मुंबईतील मनिष मेहता नामक व्यापाऱ्याने मंदीला कंटाळून आत्महत्या केली, असे सांगून हे सरकार नरबळी घेणारे सरकार असल्याचा ठपका विखे पाटील यांनी ठेवला.
विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री राजेंद्र दर्डा, वसंत पुरके, हर्षवर्धन पाटील, आ. अब्दुल सत्तार, रत्नाकर महाजन सोशल मिडीया विभागाचे प्रमुख अभिजीत सपकाळ यांनी या शिबिराल मार्गदर्शन केले.
युवक काँग्रेस आणि महिला काँग्रेसचे जिल्हास्तरीय शिबीरही आज याच ठिकाणी संपन्न झाले.
विविध पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या हस्ते काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
या शिबिराला आ. सुभाष झांबड, औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माजी आ. नामदेवराव पवार, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चारुलता टोकस, काँग्रेस सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, अनुसुचीत जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. राजू वाघमारे, माजी आ. केशवराव औताडे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस पृथ्वीराज साठे, रामकिशन ओझा, शाम उमाळकर, सचिव सत्संग मुंडे, आबा दळवी, प्रवक्ते पवन डोंगरे, युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्यासह औरंगाबाद जिल्ह्यातील प्रमुख नेते पदाधिकारी व काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बेशिस्त, बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्यांवर कडक कारवाई करा! – शंभूराज देसाई

News Desk

सिद्धू हे काँग्रेसची प्रतिमा मलिन करत आहेत !

News Desk

शिवसेनेच्या लिलाधर डाके यांची मिझोरामच्या राज्यपालपदी होणार नियुक्ती

News Desk