HW News Marathi
राजकारण

कुमारस्वामींचे सरकार कोसळणार ?

बंगळुरू | कर्नाटक निवडणुकीनंतर कोणता पक्ष सत्ता प्रस्थापित करणार यावरुन कर्नाटकमध्ये राजकीय युद्ध रंगल्याचे पहायला मिळाले होते. सत्तेत आपणच येणार असे म्हणत भाजपाने येडीयुरुप्पा यांना मुख्यमंत्री करत अवघ्या अडीच दिवसांचे सरकरा स्थापन केले होते. परंतु भाजपाला सत्तेतून पायउतार करण्यासाठी नवीन शक्कल लढवत जेडीएस आणि कॉंग्रेसने संयुक्त सरकार स्थापन केले. सत्ता स्थापन करताना जेडीएसचे कुमारस्वानी यांना कर्नाटकचे मुख्यमंत्री पद दिले गेले. परंतु मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळताना कुमारस्वामी येत्या ५ जुलै ला राज्याचे बजेट सादर करणार आहेत. परंतु या बजेटच्या सादरीकरणापुर्वी हे सरकार कोसळणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.

संयुक्त सरकार असताना खातेवाटपावरून नाराज झालेल्या आमदारांमुळे जेडीएस-काँग्रेसचे सरकार कोंडीत सापडले असल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. दोन्ही पक्षाचे नेते याबाबत चर्चेने मार्ग काढायला तयार नाहीत. त्यामुळे नाराज नेते भाजपशी संपर्क करत असल्याची चर्चा आहे. दिवसेंदिवस वेगवेगळ्या प्रकारे घडत असलेल्या या राजकीय नाट्यामुळे कर्नाटकमध्ये राजकीय भूकंप येणार असून अवघ्या चार आठवड्यांचे कुमारस्वामी यांचे सरकार कोसळणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

#RamMandir : श्रीराम संपूर्ण विश्वाचे तर मग मंदिर केवळ अयोध्येतच का ?

News Desk

अशोक चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज वैधच, फेटाळले सर्व आक्षेप

News Desk

अण्णासाहेब मायकर व्हायरल ऑडिओ क्लीपवर विनायक मेटेंच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया

Aprna
महाराष्ट्र

सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी – खा. संभाजीराजे छत्रपती

News Desk

मुंबई- भीमा-कोरेगाव हिंसाचाराचे आज राज्यसभेतही तीव्र पडसाद उमटले. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्यावतीने हिंसाचारात दोषी असलेल्यांवर कारवाईची मागणी केली गेली. याचवेळी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही राज्यसभेत निवेदन मांडले. त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला शांततेचे आवाहन तसेच दोषींवर कडक कारवाईची मागणी केली.

छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्श विचारांचा वारसा घेऊन चालणारा हा महाराष्ट्र आहे. या भूमीत अशा प्रकारची घटना घडणे ही निंदनीय आहे असे त्यांनी नमूद केले. खा. संभाजीराजे म्हणाले की, महाराष्ट्रातील जनतेने संयम व शांतता राखावी, कारण मी छत्रपती शिवरायांच्या घराण्यातील आहे. मला या घटनेबाबत प्रचंड दु:ख वाटत आहे.

अशी घटना पुन्हा महाराष्ट्रात कदापीही घडू नये असे मला वाटते. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोण्या एका समाजाला नाही तर १८ पगड जातीचे लोक आणि १२ बलुतेदार यांना एकत्र घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. राजर्षी शाहू महाराजांनीही छत्रपती शिवाजी महाराजांचा तोच आदर्श घेऊन बहुजन समाजाला एकत्र आणले, जाती पातींच्या पलिकडे जाऊन समाज उध्दार घडवला आणि अशा माझ्या महाराष्ट्राच्या भूमीत काल जो प्रकार घडला त्या घटनेने माझे मन हेलावले आहे. सर्व समाजातील एकीचे बळ हे देशाच्या विकासाचे साधन आहे.

जेव्हा समाजात शांतता व सुव्यवस्था असते तेंव्हा देशाचा विकास होत असतो. पण भारतीय जनतेची ही एकी काही समाजविघातक शक्तींच्या डोळ्यात खुपत आहेत. यासाठी काही समाजकंटक या देशात जातीय तेढ वाढवण्याचे प्रयत्न करत आहेत. आपला देश विविध जाती – पंथ – धर्म – भाषा यांनी नटलेला आहे, येथे विविधतेत एकता आहे. त्यामुळे अशा घटना महाराष्ट्रात घडू नयेत. तसेच जे समाजकंटक आहेत त्यांच्यावर ताबडतोब कडक कारवाई सरकारने करावी, असे त्यांनी सांगितले.

Related posts

रेशनवरील तांदूळ घोटाळ्याचे धागेदोरे वरपर्यंत, फडणवीसांचा गंभीर आरोप

News Desk

विखे पाटील-बाळासाहेब थोरात एकमेकांवर टीका, नंतर एकाच सोफ्यावर बसून गप्पा

News Desk

MPSC परीक्षेतून होणारं संघीकरण आणि भाजपचा प्रचार रोखा,यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

News Desk