HW Marathi
राजकारण

डॉ. बाबासहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने दिग्गज नेत्यांनी ट्वीट करत केले अभिवादन

मुंबई । महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची आज १२८ वी जयंती आहे. या निमित्ताने मुंबईसह देशभरात उत्साहाचे वातावरण असून जागोजागी जयंतीनिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर “संविधान निर्माता आणि सामाजिक न्यायचे प्रणेता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने सादर नमन | जय भीम!”

राष्ट्रपती रामनाथ गोविंद यांनी देखील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमत्ताने अभिवादन केले आहे. देशाच्या सर्व समस्यांवरील उपाय म्हणजे भारतीय संविधान ! महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ही भारताला सर्वोच्च देणगी !, असे ट्वीट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करत अभिवादन केले आहे. मुंबईमध्ये ठिकठिकाणी जल्लोष करत अभिवादन मध्यरात्रीपासूनच मुंबईमध्ये ठिकठिकाणी जल्लोष करत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यात आले.

तसेच दादर येथील चैत्यभूमीवर मध्यरात्रीपासूनच नागरिकांनी बाबासाहेबांना अभिवादन करण्यास गर्दी केली होती. “सर्वांना आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! बाबासाहेबांचे योगदान भारतासाठी अमूल्य आहे. त्यांच्या कामातून प्रेरणा घेत, मी सत्य, समता आणि न्याय यांचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करीन.” ट्वीट करत महामानवास मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि दक्षिण मुंबईचे उमेदवार यांनी अभिवादन केले आहे.

संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्ताने आपण आपल्या संविधानात नमूद केलेल्या न्याय, निष्ठा, समता आणि सार्वभौम या ४  मूल्यांकडे स्वतःला पुन्हा समर्पित करूया, असे ट्वीट काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अभिवादन केले आहे.

 

 

Related posts

पहा…मुलींनंतर आता डास पळविणार आमदार राम कदम

News Desk

सरकारचे प्रेम फक्त मुस्लीम महिलांवर, शबरीमलाचा निर्णय मात्र हिंदू महिलांविरोधात !

News Desk

संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून

News Desk