HW Marathi
राजकारण

पालकमंत्री राम शिंदे यांचा शेतक-यांना अजब सल्ला !

अहमदनगर | महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत असताना, भाजप सरकार मध्ये असलेले मंत्री मात्र शेतकऱ्यांची क्रुर थट्टा करत आहेत. महाराष्ट्रात दुष्काळाची समस्या गंभीर बनत चालली आहे. पण भाजप सरकार शेतकऱ्यांना कोणतीही मदत करायला तयार नाही. त्यातच महाराष्ट्राच्या काहीच भागात दुष्काळ जाहीर केला आहे. दुष्काळच्या यादीमध्ये आपल्याही गावाचा समावेश करावा यासाठी शेतकरी प्रयत्न करत आहे. पण महाराष्ट्रातील हे निर्दयी आणि असंवेदनशील सरकार शेतकऱ्यांचीच थट्टा करत आहे.

नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात यंदा दुष्काळी परिस्थिती आहे, या तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी काही लोक पालकमंत्री राम शिंदे यांच्याकडे निवेदन घेवून गेले असता, शेतकऱ्यांना मदत करायची सोडुन त्यांनी दुष्काळ पडलाय तर बघत काय बसलाय, जनावरे पाहुण्यांकडे सोडा, असा अजब सल्ला दिला !

राम शिंदे यांच्या या असंवेदनशील वक्तव्याबद्दल संपूर्ण नगर जिल्ह्यातील शेतकरी संतप्त झाले आहेत. भाजपाच्या ह्या असंवेदनशील सरकार बद्दल शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहेच. पण येणाऱ्या निवडणुकीत शेतकरीच भाजपा सरकारची मस्ती उतरवणार आहेत.

 

Related posts

…टीका करणाऱ्यांची मने प्रदूषित!

rasika shinde

मोदी सरकारच्या विमान प्रवास खर्चात लक्षणीय घट

News Desk

पंतप्रधान मोदींनी घेतली चीनच्या राष्ट्राध्यक्षांची भेट

News Desk