HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

सीआरपीएफचे जवान नसते तर मी तिथून जिवंत बाहेर पडू शकलो नसतो !

नवी दिल्ली | “सीआरपीएफचे जवान नसते तर मी तिथून जिवंत बाहेर पडू शकलो नसतो,” अशी भिती भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केली आहे. पश्चिम बंगालची राजधानी कोलकत्तामध्ये शहांच्या रोड शो दरम्यान उभे असलेल्या ट्रकवर काठ्या फेकण्यात आल्या. या पार्श्वभूमीर शहा यांनी आज (१५ मे) पत्रकार परिषद घेऊन  पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तोफ डागली.

या पत्रकार परिषदेत शहा असे देखील म्हणाले की, ममता बॅनर्जी या फक्त ४२ जागांवर लोकसभा निवडणूक लढवित आहेत. भाजप देशभरातील सर्व राज्यात निवडणुका लढवित आहेत. देशातील सर्व राज्यात शांततेने मतदान पार पडले. फक्त पश्चिम बंगालमध्ये मतदानावेळी हिंसाचार झाला. या हिंसाचाराला केवळ तृणमूल काँग्रेस जबाबदार आहे, असा आरोप शहांनी तृणमूलवर केला आहे. आम्ही देशभरात निवडणूक लढवली. पण तिथे हिंसाचार झाला नाही. कारण तिथे तृणमूल नाही. फक्त पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार झाला. कारण केवळ याच राज्यात तृणमूल सत्तेत आहे, असे शहा यावेळी म्हणाले.

या पत्रकार परिषदेत शहांनी पत्रकार तृणमूलसह राज्यातील निवडणूक आयोग आणि पोलिसांवर जोरदार हल्ला चढवला. ‘तृणमूल काँग्रेसला पराभव स्पष्ट दिसू लागला आहे. त्यामुळेच आता भाजपला रोखण्यासाठी हिंसेचा वापर होत आहे. काल (१४ मे) संध्याकाळी भाजपचा रोड शो होता. त्यापूर्वी तृणमूलच्या गुडांनी भाजपचे पोस्टर फाडले. पण पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली होती.

हिंसाचाराचा जितका चिखल फेकाल, तितके कमळ जोमाने फुलेल, हे दीदींनी लक्षात ठेवावे’ असे शहा यांनी म्हटले. ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा महाविद्यालयातला पुतळादेखील तृणमूलच्या गुंडांनी मोडल्याचा आरोप शहांनी केला. संध्याकाळी सात वाजता महाविद्यालयातल्या पुतळ्याची कशी काय मोडतोड होते? बंद झालेले महाविद्यालय कसे काय उघडले जाते? महाविद्यालयाच्या चाव्या कोणाकडे आहेत?, असे प्रश्न शहांनी उपस्थित केले.

Related posts

पाकिस्तानच्या सांगण्यावरून भारताविरोधात लेख लिहिण्याचा दावा, शोभा डे यांनी फेटाळला

News Desk

मुंबई भाजपच्या अध्यक्ष पदी मंगलप्रभात लोढा यांची निवड

News Desk

मोदी तुमच्या पापाचा घडा भरला आहे | नवाब मलिक

News Desk