HW Marathi
राजकारण विधानसभा निवडणूक २०१९

HW Exclusive | पंतप्रधानांपेक्षा मला प्रज्ञा ठाकूर जास्त आदर्श वाटतात !

मुंबई | पुण्यातील मॉडर्न कॉलेजमध्ये आज (७ फेब्रुवारी) महात्मा गांधींच्या १५० व्या जन्मशताब्दीनिमित्ताने दोन दिवसीय चर्चा सत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चा सत्रासाठी महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधींना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र, ऐनवेळी कोणतेही कारण न देता हे चर्चासत्र रद्द करण्यात आले. चर्चसाठी तुषार गांधींना निमंत्रित केल्याने आयोजकांना आणि महाविद्यालयांना धमकी आल्याने त्यांनी हा कार्यक्रम रद्द केल्याचे वृत्त आले. काही गांधीविरोधी आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या दबावामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचा आरोप झाला. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर एच.डब्ल्यू.मराठीने तुषार गांधी यांच्याशी बातचीत करून हा नेमका प्रकार काय घडला ? याबाबत सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी बोलताना, तुषार गांधी यांनी पंतप्रधानांचे गांधी प्रेम, गांधी भक्ती दांभिक असल्याचे म्हटले आहे.
पंतप्रधान मोदींच्या गांधी भक्तीवर टीका करताना तुषार गांधी असे म्हणाले कि, “पंतप्रधानांची गांधीभक्ती ही अत्यंत दांभिक आहे. पंतप्रधान मोदी लोकसभेत जेव्हा महात्मा गांधींबाबत बोलत होते तेव्हा त्यांच्या बरोबर पाठी गांधीविरोधी आणि नथुराम गोडसेंना समर्थन देणाऱ्या भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर बसल्या होत्या. ज्यांच्या गांधींविषयीच्या वारंवार केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांनंतरही  त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्याची पंतप्रधानांमध्ये क्षमता नाही. पंतप्रधानांची ही जी गांधी भक्तीची दांभिकता आहे, त्यापेक्षा मला त्या प्रज्ञा ठाकूर जास्त आदर्श वाटतात. कारण, गोडसेवादी विचारधारेला जे त्यांचे समर्थन आहे ते त्या स्पष्टपणे बोलतात”, असे म्हणत तुषार गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सणसणीत टीका केली आहे. ते एच.डब्ल्यू.मराठीशी बोलत होते.

Related posts

Loksabha Election 2019 | तारखा जाहीर होण्यापूर्वीच प्रचारसभांची तयारी

News Desk

सुप्रिया सुळेंनी खासदारकीचा राजीनामा द्यावा !

News Desk

मुख्यमंत्री अन् काँग्रेस नेत्यांची आजची बैठक रद्द, ‘हे’ आहे कारण 

News Desk