HW Marathi
राजकारण विधानसभा निवडणूक २०१९

HW Exclusive | आक्षेप माझ्यावर की महात्मा गांधींच्या विचारावर ?

मुंबई | पुण्यातील मॉडर्न कॉलेजमध्ये आज (७ फेब्रुवारी) महात्मा गांधींच्या १५० व्या जन्मशताब्दीनिमित्ताने दोन दिवसीय चर्चा सत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चा सत्रासाठी महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधींना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र, ऐनवेळी कोणतेही कारण न देता हे चर्चासत्र रद्द करण्यात आले. चर्चसाठी तुषार गांधींना निमंत्रित केल्याने आयोजकांना आणि महाविद्यालयांना धमकी आल्याने त्यांनी हा कार्यक्रम रद्द केल्याचे वृत्त आले. काही गांधीविरोधी आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या दबावामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचा आरोप झाला. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर एच.डब्ल्यू.मराठीने तुषार गांधी यांच्याशी बातचीत केली. यावेळी, तुषार गांधी घडलेल्या या संपूर्ण प्रकारची माहिती दिली.

“पुण्याच्या मॉडर्न कॉलेजच्या एका प्राध्यापिकेने मला काल सकाळी अचानक फोन करून सांगितले कि काही अपरिहार्य कारणांमुळे हे पूर्ण सत्रच रद्द करावे लागत आहे. तेव्हा मला आश्चर्य वाटलं कि एवढा मोठा कार्यक्रम ऐनवेळी का रद्द करण्यात येतोय ? म्ह्णून मी माझ्यासोबत ज्यांना निमंत्रित करण्यात आलं होतं त्या अन्वर राजन यांना या प्रकाराबाबत विचारलं. त्यानंतर चौकशी केल्यानंतर त्यांना असं कळलं कि, पतितपावन नावाच्या एका संस्थेने आयोजकांना अशी धमकी दिली कि जर मी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो तर ते कार्यक्रम होऊ देणार नाही, उध्वस्त करतील. म्हणून तो कार्यक्रम रद्द करण्यात आला”, असे तुषार गांधींनी एच.डब्ल्यू. मराठीशी बोलताना सांगितले.

आक्षेप माझ्यावर कि महात्मा गांधींच्या विचारावर ?

“सावित्रीबाई फुले विद्यापीठाने याला फंडिंग दिले होते. त्यामुळे, आयोजकांना अशी भीती होती कि, या कार्यक्रमात मी जर काहीही उलट-सुलट बोललो तर त्याबाबत त्यांना उत्तरं देणं कठीण होईल. त्याचप्रमाणे, काही विद्यार्थी संघटनांनी देखील धमकी दिल्याने त्यांनी हा कार्यक्रम रद्द केला. मला फक्त इतकंच वाटतं कि, जर त्यांना माझी उपस्थिती खटकत असेल तर त्यांनी संपूर्ण कार्यक्रम रद्द करण्याची गरज काय ? त्यांनी केवळ माझं भाषण रद्द केलं असतं तरीही ठीक होतं. पण, त्यांनी संपूर्ण दोन दिवसीय कार्यक्रमच रद्द केल्यामुळे आता प्रश्न असा उपस्थित होतो कि, कार्यक्रमाच्या विषयावरच त्यांना आक्षेप होता कि काय ? ‘रिव्हिझिटिंग गांधी’ या विषयावरच त्यांना आक्षेप होता. म्हणूनच अशा पद्धतीने दडपशाही करून त्यांनी हा कार्यक्रम रद्द करायला लावला का ?”, असा प्रश्न देखील यावेळी तुषार गांधींनी उपस्थित केला.

विचारांना दाबून ठेवण्याची ही वृत्ती बळावतेय !

“विचारांना डांबून किंवा दाबून ठेवण्याची ही जी वृत्ती आहे ती आपल्या संविधानाविरुद्ध आहे. आपल्या संविधानात प्रत्येक व्यक्तीला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. मात्र, जेव्हा सरकारच विचारांना दाबणाऱ्या वृत्तीचे समर्थ करते तेव्हा हा प्रश्न उपस्थित होतो कि नक्की आपली आस्था आपल्या संविधानासोबत आहे का ? आता अशी वेळ आली आहे कि, या सरकारचा विरोध म्हणजे संविधान भक्ती किंवा देशभक्ती ठरेल. म्हणूनच जर ते आम्हाला अशा पद्धतीने गप्प बसायला भाग पाडणार असतील तर जिथून कुठून आमचा विचार आम्ही मांडू शकतो तिथून तिथून सातत्याने आम्ही तो मांडत राहू”, असेही तुषार गांधी इच.डब्ल्यू.मराठीशी बोलताना म्हणाले.

Related posts

#LokSabhaElections2019 : देशातील राजकारणाची घसरलेली पातळी

News Desk

मेट्रोच्या कामासाठी पुन्हा एकदा झाडांचा बळी

rasika shinde

केजरीवालांनी महिलांच्या सुरक्षेसाठी मेट्रो आणि बसमध्ये प्रवास केला मोफत

News Desk