HW Marathi
राजकारण

जातीचे नाव काढेल त्याला ठोकून काढेन, गडकरींचा इशारा 

नवी दिल्ली । केंदीय मंत्री नितीन गडकरी यांनी जातीचे राजकारण करणाऱ्यांना सुनावले आहे. “मी सर्वांना सांगूनच ठेवले आहे की, जो जातीचे नाव काढेल त्याला ठोकून काढेन”, असे नितीन गडकरी म्हणाले. “मी जात मानत नाही. आर्थिक, सामाजिक समतेच्या आधारावर अखंड समाज संघटित व्हायला हवा”, असेही ते यावेळी म्हणाले. ते पिंपरी-चिंचवडमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते.

“तुमच्याकडे जात किती मानतात ते मला माहित नाही. आमच्या पाच जिल्यांमधून मात्र जात हद्दपार झाली आहे. कोणताही व्यक्ती हा छोट्या किंवा मोठ्या जातीचा असता कामा नये. आर्थिक, सामाजिक समतेच्या अखंड समाज असायला हवा”, असे गडकरी म्हणाले.

पिंपरी-चिंचवड मतदार संघातील ३० नगरसेवक आणि नेत्यांनी गडकरींची भेट घेऊन मावळ लोकसभा मतदारसंघ भाजपलाच मिळायला हवा, अशी मागणी केली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या काही दिवसांपासून भाजप-शिवसेनेच्या नेत्यांमध्ये मोठी धुसफूस सुरू आहे.

Related posts

सुभाष देशमुख यांची तात्काळ हकालपट्टी करा | सचिन सावंत

News Desk

शिवसेनेकडून फोन आल्यानंतर मी मतदान केले !

News Desk

RamMandir : …म्हणून आज रात्रीच सर्व शिवसैनिक महाराष्ट्रात परतणार

News Desk