विष्णुपूर | लोकसभा निवडणुकीच्या पाटव्या टप्प्यासाठी काल (६ मे) मतदान झाले आहे. आता शेवटचे दोन टप्पे राहिले असून त्यासाठी राजकीय नेते मंडळींनी कंबर कसली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी मी नरेंद्र मोदींना देशाचा पंतप्रधान मानत नाही, अशी त्यांनी टीका केली आहे. जो माणूस आपल्या बायकोचा संभाळ करू शकत नाही, तो देशातील नागरिकांचा संभाळ कसा करणार? असा सवाल ममता दीदींनी उपस्थित केला आहे.
Mamata Banerjee in Bishnupur: If I am a toll collector then what are you? From head to toe you are filled with people’s blood. When asked what does his (PM) wife do & where does she stay, he (PM) said he doesn't know. He can't take care of his wife, he will take care of Indians? https://t.co/VoikojGG32
— ANI (@ANI) May 6, 2019
पश्चिम बंगालमध्ये फनी चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी ममता बॅनर्जी यांच्या समवेत आढावा बैठक घेऊ इच्छित होते. ‘‘मी नरेंद्र मोदींना देशाचा पंतप्रधान मानत नाही, त्यामुळे मी त्यांच्या कोणत्या बैठकीत सहभागी झाले नाही. मी त्यांच्यासोबत एका मंचावरही उपस्थित राहू इच्छित नाही. मी येणाऱ्या पंतप्रधानांशी वादाळासंदर्भात चर्चा करेन. वादळामुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. निवडणुकीपूर्वी आम्हाला केंद्राच्या मदतीची गरज नाही,’’ असा खरपूस समाचार ममता दीदींना घेतला आहे.
यावेळी बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, “जर मी टोल कलेक्टर आहे तर तुम्ही कोण आहे? तुमचे हात रक्ताने माखलेले आहेत. जेव्हा तुम्हाला विचारलं जातं तुमची पत्नी काय करते? ती कुठे राहते? तर त्यावर पंतप्रधानांकडे उत्तर नाही. जो स्वत:च्या पत्नीचा संभाळ करु शकत नाही तो भारतीयांचा संभाळ कसा करणार?” असा टोला ममतांनी मोदींना लगावला. भाजप बाबू तुम्ही म्हणाले होतात की, तुम्ही राम मंदिर बांधणार होतात, मग राम मंदिरराचे काय झाले ? परंतु एकही मंदिर तुम्ही बांधले नाही.
W Bengal CM Mamata Banerjee in Bishnupur: You BJP babu, you say 'Jai Sri Ram' but have you built even one Ram temple? At the time of elections Ram Chandra becomes your party agent, you say 'Ram Chandra is my election agent'. You say 'Jai Sri Ram' & force others to say it.(6.5.19) pic.twitter.com/FlPtKPZtaw
— ANI (@ANI) May 6, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.