मुंबई | “मी फिक्स मॅच पाहात नाही, त्यामुळे मी लाईव्ह मॅच बघत असतो, खरी मॅच मी बघत असतो,” असा टोला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackraey ) यांच्या मुलाखतीवर प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरेंनी ही मुलाखत ‘सामना’चे (saamana) कार्यकारी संपादक संजय राऊत (sanjay raut) यांनी घेतली आहे. या मुलाखतीचा पहिला भाग आज (26 July) सकाळी 8.30 वाजता प्रसारित करण्यात आला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मी फिक्स मॅच पाहात नाही, त्यामुळे मी लाईव्ह मॅच बघत असतो, खरी मॅच मी बघत असतो. ही फिक्स मॅच आहे. ती पाहून त्यावर काय प्रतिक्रिया द्यायची?, काही दिवसांनी जेव्हा सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील, तेव्हा देऊ प्रतिक्रिया देऊ.” सामनाच्या मुलाखतीवर पत्रकारांनी प्रश्न विचारला असताना
अडीच वर्षाच्या ठरावावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “आता जे भाजपने केलेले आहे, हे माझ्याशी बोलणी केल्याप्रमाणे तेव्हा केले असते तर ते सन्माने झाले असते. देशभरामध्ये पर्यटन करण्याची गरज वाटली नसती आणि असे मी ऐकले, असे मी वाचले, माझ्या माहिती प्रमाणे हजारो कोटी रुपये खर्च केले गेले. विमानांचा खर्च, हॉटेलचा खर्च यानंतर काही अतिरिक्त खर्च म्हणजे खोक्यातला खर्च. त्या खोक्यात काय दडलेय, हे ज्याचे त्याला माहिती, हे घेणाऱ्याला आणि देणाऱ्याला कळाले असेल, पण हे सर्व फुकटात झाले असते, आणि सन्मानाने झाले असते. हेच तर मी सांगत होतो,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.