मुंबई | “आम्ही उद्या विश्वासदर्शक ठरावासाठी मुंबईत पोहोचणार आहोत,” अशी माहिती शिवसेनेचे बंडखोर नेता एकनाथ शिंदे यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले. शिंदेंनी आज (29 जून) गुवाहाटीतील कामाख्या देवीचे दर्शन गेले होते. दर्शनानंतर शिंदेंनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, सर्व बंडखोर आमदार उद्या मुंबईत विश्वासदर्शक ठरावासाठी मुंबईला पोहोचणार आहोत. ठरावानंतर आमदारांची बैठक होणार असून यात पुढील रणनीती ठरविण्यात येणार आहे,” अशी माहिती त्यांनी दिली.
एकनाथ शिंदे म्हणाले, “मी आता कामाख्या देवीच्या दर्शनासाठी आलो आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या सुख-समृद्धी आणि समाधानासाठी मी देवीच्या दर्शनासाठी गेलो होतो. आम्ही उद्या विश्वासदर्शक ठरावासाठी मुंबईत पोहोचणार आहोत. राज्यपालांनी विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलविले आहे. आम्ही उद्या सर्व आमदारांसह विश्वासदर्शक ठरावासाठी मुंबईला पोहोचणार आहोत. ऐवढच मी तुम्हाला आता सांगू इच्छितो.” तुम्ही कोणाला समर्थन करणार पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर शिंदे म्हणाले, “आम्ही शिवसेनेचे आमदार आहोत. शिवसेनेच्या आमदाराच्या रुपात आम्ही विधीमंडळात पोहोचणार आहोत.”
I'm here to pray for the peace & happiness of Maharashtra. Will go to Mumbai tomorrow for the floor test & follow all the process: Rebel Shiv Sena leader Eknath Shinde, in Guwahati, Assam pic.twitter.com/ErHwhz6Ny2
— ANI (@ANI) June 29, 2022
बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक म्हणून विश्वादर्शक ठरावाचा सामना करणार
देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री पदी विराजमान होणार आहे, तुम्ही त्यांना समर्थन करणार का? पत्रकारांच्या प्रश्नावर शिंदे म्हणाले, “पहिल्यांदा उद्या विश्वासदर्शक ठरावा आहे. हा विश्वासदर्शक ठराव होऊ द्या. त्यानंतर पुढील जी काही रणनिती आहे. तुम्हाला सांगण्यात येईल. आणि यानंतर विश्वासदर्शक ठरावानंतर आमच्या आमदारांची बैठक होणार आहे. आणि या बैठीत ठरविण्यात येईल की पुढे काय करणार आहे. तुम्हाला उद्या कळेल की, बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक म्हणून विश्वादर्शक ठरावाला सामोरे जाणार आहोत. शिवसेनेचे आम्ही सदस्य असून आमच्याकडे 2/3 संख्याबळ आहे. उद्या विश्वासदर्शक ठराव झाल्यानंतर पुढील जी रणनिती आहे. आमच्या आमदारांसोबत होणाऱ्या बैठकीत ठरविल्यानंतर तुम्हाला कळविण्यात येईल,”
संबंधित बातम्या
राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना विश्वासदर्शक ठराव सिद्ध करण्यासाठी पत्र पाठविले; उद्या ‘मविआ’ सरकार येणार धोक्यात?
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.