HW News Marathi
राजकारण

मी भीमा कोरेगावला जाणारच !

मुंबई | भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी नजर कैदेतून अखेर सुटका करण्यात आली आहे. आझाद यांना मालाड येथील हॉटेल मनाली येथे गेल्या तीन दिवसांपासून पोलिसांनी नजरकैदैत ठेवले होते. परंतु, अनेक सामाजिक संघटनांकडून दबाव आल्यानंतर आझाद यांची नजरकैदेतून सुटका करण्यात आली आहे. नजर कैदेतून सुटल्यानंतर आझाद यांनी पत्रकार परिषद घेऊन ‘मी भीमा कोरेगाव येथे जाणार असल्याचे आझाद यांनी म्हटले आहे.’

‘मला विरोध करणे म्हणजे संविधानाला विरोध करणे, असल्याचेही आझाद यांनी यावेळी म्हटले आहे. मी महाराष्ट्र सरकारविरोधात उच्च न्यायालयात जाणार असून १ जानेवारीला शौर्यदिनाच्या निमित्ताने भीमा कोरेगाव येथे जाणार असल्याचेही आझाद यांनी म्हटले.’आझाद यांना पुण्यात येताना पोलीस त्यांना रोखणार नाहीत, परंतु त्यांना पुण्यात सभा घेता येणार नाही, अशी माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे. चंद्रशेखर आझाद आणि त्यांचे सहकारी आज (३० डिसेंबर) दुपारी १ वाजेच्या दरम्यान मालाडच्या हॉटेल मनालीमधून पुण्याच्या दिशेने निघाले होते.

भीम आर्मीला महाराष्ट्रात २ जानेवारीपर्यंत सभा घेण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. याशिवाय कार्यकर्त्यांनाही जवळच्या पोलीस ठाण्यात हजेरी लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय भीमा कोरेगाव इथे २ जानेवारीपर्यंत जाण्यासही भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना मज्जाव करण्यात आला आहे.

महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले आझाद यांना शुक्रवारी (२८ डिसेंबर) रात्री चैत्यभूमी येथे जात असतानाच मुंबई पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर मालाडच्या हॉटेलमध्ये नजरकैदेत ठेवले होते. शिवाय खबरदारीचा उपाय म्हणून राज्यभरातील भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे जांबोरी मैदानावरील आझाद यांची शनिवारची (२९ डिसेंबर) सभा रद्द झाली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांचा गोंधळ

News Desk

ऐरोलीतून गणेश नाईक यांना उमेदवारी, संदीप नाईक यांची माघार

News Desk

जावई पडल्याचे दुःख नाही तेवढे दुःख चंद्रकांत खैरे पडल्याचे आहे !

News Desk
मनोरंजन

जेष्ठ दिग्दर्शक मृणाल सेन यांचं निधन

News Desk

मुंबई | भारतीय चित्रपट जगतात अतिशत मोलाचं योगदान देणारे जेष्ठ चित्रपट दिग्दर्शक मृणाल सेन यांचे रविवारी(३० डिसेंबर) सकाळी निधन झाले. सेन हे ९५ वर्षांचे होते. १४ मे १९२३ मध्ये त्यांचा जन्म झाला होता. कोलकाता येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भारत सरकारने सेना पद्मभूषण या नागरी पुरस्कार आणि चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी सर्वोच्च अशा दादासाहेब फाळके पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले होते.

सेन यांच्या निधनाने भारतीय चित्रपट सृष्टीच्या एका युगाचा अंत झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. १९५५ मध्ये रात भोर या चित्रपटातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. १९६० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘नील आकाशेर नीचे’ या चित्रपटामुळे त्यांची विषेश ओळख निर्माण झाली. ‘बाइशे श्रावण’ या चित्रपटामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय ओळख मिळाली.

सेन यांनी बांगला भाषेतील चित्रपटांची सर्वाधिक निर्मिती केल्याचा मान मिळविला आहे. मिथुन चक्रवर्ती यांचा पहिला चित्रपट ‘मृगया’चं दिग्दर्शन ही त्यांनी केलं होतं. मृणाल सेन यांना २० राष्ट्रीय आणि १२ आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. ‘इप्टा’ या सांस्कृतिक संघटनेत ते सक्रिय होते. वयाच्या ८० व्या वर्षी २००२ साली ‘अमर भुवान’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते तो त्यांनी दिग्दर्शीत केलेला शेवटचा चित्रपट ठरला.

 

 

Related posts

हास्य सम्राट काळाच्या पडद्याआड

News Desk

चॉकलेट फज

News Desk

‘थार’च्या वाळवंटात रंगणार ‘राग’स्थान’ महोत्सव!

swarit