May 24, 2019
HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

‘त्या’ वक्तव्यासाठी साध्वी प्रज्ञा यांना कधीही मनापासून माफ करू शकणार नाही !

नवी दिल्ली | “साध्वी प्रज्ञा सिंह यांनी नथुराम गोडसेबाबत केलेले वक्तव्य हे अत्यंत घृणास्पद असून त्यांनी याबाबत माफी मागितली असली तरीही मी कधीही त्यांना मनापासून माफ करू शकणार नाही”, अशी बोचरी प्रतिक्रिया पंतप्रधान मोदी यांनी दिली आहे. साध्वी प्रज्ञा या वारंवार आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे मोठ्या अडचणीत सापडत आहेत. सुरुवातीला साध्वी प्रज्ञा यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याविषयी तर आता नथुराम गोडसेबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. दरम्यान, याप्रकरणी साध्वी प्रज्ञा यांनी माफी मागितली असली तरीही आपण त्यांना माफ करणार नसल्याचे मोदींनी म्हटले आहे. साध्वी प्रज्ञा यांच्या वादग्रस्त वक्तव्यांवर पंतप्रधान मोदींनी प्रथमच अशी जाहीर प्रतिक्रिया दिली आहे.

पंतप्रधान मोदी हे एका हिंदी वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत बोलत होते. “नथुराम गोडसे देशभक्त होते, आहेत आणि राहतील”, असे साध्वी प्रज्ञा यांनी म्हटले आहे. “साध्वी प्रज्ञा सिंह यांनी केलेले विधान हे टीकेच्या योग्यतेचेच आहे. सभ्य समाजात अशी भाषा, अशी वक्तव्ये होता कामा नयेत. त्यांनी याबाबत माफी मागितली आहे. मात्र मी त्यांना कधीही मनापासून माफ करू शकणार नाही,” असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या भोपाळ मतदारसंघाच्या उमेदवार असलेल्या साध्वी प्रज्ञा यांची वक्तव्ये भाजपला भोवत आहेत.

Related posts

जात पडताळणीवरुन उद्धव ठाकरे कडाडले

News Desk

Bhima Koregaon Case : वरवर राव यांना २६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

News Desk

दुष्काळाबाबत केंद्र-राज्य सरकार गंभीर नाही !

News Desk