HW Marathi
राजकारण

भिडेंना अटक झाली नाहीतर विधान भवनाला घेराव घालू | प्रकाश आंबेडकर

मुंबई | भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी आरोपी असलेल्या संभाजी भिडेंना अटक झाली नाही तर विधान भवनाला घेराव घालू असे वक्तव्य भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले ते बुधवारी बॅलॉर्ड पिअर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

संभाजी भिडेंना अटक तसेच भीमा कोरेगाव शौर्य दिन प्रेरणा अभियानातील २६० संघटनांच्या विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी आंबेडकर यांनी यावेळी केली आहे. संभाजी भिडेंना वाचवण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांवर खोटे आरोप करुन त्यांना अटक केली जात आहे.  त्याचबरोबर आरएसएसच्या सांगण्यावरुन सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांना अटक केल्याचा आरोप आंबेडकर यांनी पत्रकारांशी बोलताना  केला . राज्य सरकार हे कामगार संघटना संपविण्याचा प्रयत्न करत असल्याचे बोलत त्यांनी सरकारवर चांगलेच तोडसुख घेतले.

भीमाकोरेगाव दगंल प्रकरणी संभाजी भिडेंना अटक होणार का ? विद्यार्थ्यांवर असलेले गुन्हे मागे घेतले जाणार का? प्रकाश आंबेडकर यांच्या सम्यक विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थी आंदोलनाला यश येणार का? हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

 

Related posts

अरविंद सुब्रमण्यन यांचा राजीनामा

News Desk

पुण्यात शिवसेनेनला युतीत एक जागा मिळत नाही? कुठून येते ही हतबलता !

News Desk

हार्दिक पटेलला लोकसभा निवडणूक लढविता येणार नाही ?

News Desk