नवी दिल्ली | जर प्रभू श्रीराम हे संपूर्ण विश्वाचे आहेत तर मग त्यांचे मंदिर केवळ अयोध्येतच का ?, असा प्रश्न जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे प्रमुख फारूक अब्दुल्ला यांनी उपस्थित केला. फारूक अब्दुल्ला यांच्या या प्रश्नाला जदयू नेते पवन वर्मा यांनी प्रतिप्रश्न केला. ‘अयोध्या हे प्रभू श्रीराम यांचे जन्मस्थळ असून अयोध्येतच श्रीरामांचे मंदिर व्हावे ही हिंदूंची भावना असेल तर मग ते मंदिर का होऊ शकत नाही ? असा प्रश्न पवन वर्मा यांनी केला.
But what we are talking about? Meri maa ko gaali diya, mere baap ko gaali diya. Is that the level of the PM? I have never used my father and my mother in my language. As PM of this nation, he has to think in a bigger way: Farooq Abdullah in Delhi (26.11.2018) https://t.co/dfLOYxbuUd
— ANI (@ANI) November 27, 2018
माजी केंद्रीय मंत्री मनिष तिवारी यांच्या या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी फारूक अब्दुल्ला यांनी पंतप्रधान मोदींवर देखील सडकून टीका केली. “मेरी माँ को गाली दिया, मेरे बाप को गाली दिया ?’ असे बोलणे पंतप्रधान मोदींना योग्य वाटते का ?, असा सवाल फारूक अब्दुल्ला यांनी उपस्थित केला आहे. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या आई-वडिलांचा भाषणात केलेल्या उल्लेखाबद्दलही फारूक यांनी टीका केली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.