नवी दिल्ली | “भाजपच्या नेतृत्त्वाखाली एनडीएत असणारे मित्र पक्ष हे आपापल्या राज्यात भक्कम स्थितीत आहेत. त्यामुळे जर तुमचा पंतप्रधान होणार असेल, तर मुख्यमंत्रीपद त्या त्या मित्रपक्षांना द्या”, अशी मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. लोकसभा निवडणूक अवघ्या काहीच दिवसांवर आलेली असताना देखील शिवसेना-भाजप युतीची चर्चा अद्याप सुरुच आहे. ही चर्चा सुरू असतानाच आता शिवसेनेने ही नवी मागणी केली आहे. दरम्यान, शिवसेनेची ही मागणी भाजपला पटणार का ?, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Shiv Sena leader Sanjay Raut: If NDA government is formed in 2019, Shiv Sena, Akali Dal & other major allies will have a role. All the allies of NDA are strong in their states & if you want to have an alliance with them at centre, the CM in that state should be from that ally. pic.twitter.com/3KRoPPvMo9
— ANI (@ANI) February 14, 2019
“एनडीएने २०१९ मध्ये सत्ता स्थापन केल्यास त्यामध्ये शिवसेना, अकाली दल आणि एनडीएतील मित्रपक्षांची महत्त्वाची भूमिका असेल. एनडीएतील मित्रपक्षांची आपापल्या राज्यातील स्थिती अत्यंत भक्कम आहे. त्यामुळे जर भाजपला केंद्रात त्यांच्या मित्रपक्षांचा पाठिंबा हवा असेल, तर त्यांनी त्या त्या मित्रपक्षांना मंत्रिपद द्यावे”, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप २५, तर शिवसेना २३ लढवेल तर विधानसभा निवडणुकीत भाजप १४५, तर शिवसेना १४३ जागा लढवणार असल्याचे म्हटले जात आहे. परंतु यापूर्वी शिवसेनेकडून आगामी निवडणुकांच्या जागावाटपासाठी १९९५चा फॉर्म्युला वापरण्याची मागणी करण्यात येत होती. शिवसेनेने १९९५ मध्ये विधानसभेच्या १७१ आणि भाजपने ११७ जागा लढवल्या होत्या. त्यावेळी राज्यात १३८ जागा जिंकून युतीचे पहिले सरकार स्थापन झाले होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.