HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

एसटी बसेस, बस स्टॉपसह सार्वजनिक ठिकाणच्या सरकारी जाहिराती तात्काळ काढा !

मुंबई | आगामी लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता १० मार्चपासून लागू झालेली आहे. असे असतानाही राज्यभरातील एसटी बसेस, बस स्टॉप, पेट्रोल पंपासहित इतर सार्वजनिक ठिकाणी असलेल्या सरकारी जाहिराती अद्याप काढण्यात आलेल्या नाहीत. निवडणूक आयोगाने आदेश देऊनही त्याची अंमलबजावणी झाली नाही. याचा जाब निवडणूक आयोगाने सरकारला विचारून संबंधितांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्विनीकुमार यांना पत्र लिहून केली आहे.

Related posts

एखाद्या माणसाने किती थपडा खाव्यात याला काही मर्यादा आहे की नाही?

News Desk

पंकजा मुंडेंनी भाजपची कार्यकारणी जाहीर केल्यानंतर टीमचे केले अभिनंदन

News Desk

मी नेहमीच ‘छत्रपती शिवाजी महाराज कि जय’च्या घोषणा देत राहिलो !

News Desk