HW News Marathi
राजकारण

उद्या दुपारी शिवसेना आमदारांची तातडीची बैठक

मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उद्या (३१ ऑक्टोबर) आपल्या आमदारांची तातडीची बैठक बोलावली आहे. याच पार्श्वभूमी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा कोकण दौरा देखील पुढे ढकलण्यात आला आहे. गुरुवारी दुपारी १२ वाजता शिवसेना भवनात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेची ही बैठक पार पडणार आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्तास्थापनेवरून सध्या महायुतीचे दोन मोठे पक्ष असलेल्या भाजप-शिवसेनेतच मोठी चढाओढ पाहायला मिळत आहे. या चढाओढीत या दोन्ही पक्षांमध्ये मोठा तणाव निर्माण झाल्याचे देखील दिसून येतेय. उद्या होणाऱ्या या बैठकीत शिवसेना आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. त्यामुळे, शिवसेनेच्या या बैठकीकडे त्याचप्रमाणे राज्यातील शिवसेना-भाजपच्या युतीच काय होणार ? याकडे सर्वांचेच लक्ष आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी (२६ ऑक्टोबर) विजयी आमदारांसोबतच्या बैठकीनंतर सत्तास्थापनेबाबत शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. ज्यात शिवसेनेने भाजपवर काहीसा दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी अनौपचारिक चर्चेत “मीच पुन्हा मुख्यमंत्री होणार. शिवसेनेसोबत ५०-५०चा फॉर्म्युला ठरलेलाच नाही. अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाबाबत कोणताही शब्द दिलेला नाही”, अशी विधाने केली. मुख्यमंत्र्यांच्या या विधानानंतर आता युतीत मोठा तणाव निर्माण झाला आहे. या दरम्यान शिवसेना, भाजपच्या नेत्यांकडून येत असलेल्या उलट-सुलट प्रतिक्रियांमुळे देखील संभ्रम निर्माण झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पर्रीकर यांच्या निधनानंतर गोव्याच्या मुख्यमंत्रीपदासाठी राजकीय पक्षांची चढाओढ

News Desk

ना दलित, ना मुसलमान ‘जाट’ आहेत हनुमान !

News Desk

“काय लायकी तरी हाय का? उंची किती, डोकं केवढं”, विनायक राऊतांची नारायण राणेंवर जहरी टीका

Darrell Miranda