HW News Marathi
राजकारण

गोव्यात काँग्रेसला मोठी गळती! 11 पैकी 10 आमदार भाजपमध्ये जाण्याची शक्यता

मुंबई | गोव्यात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. गोव्यात काँग्रेस विधिमंडळ गटातील अकरापैकी दहा आमदार भाजपमध्ये विलीन होण्याची शक्यता वर्तवली जात आहेत. आणि भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी देखील विलिनीकरणासाठी हिरवा कंदील दिला आहे. काँग्रेसचे हे सर्व आमदार आज (10 जुलै) सायंकाळी प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली आहे. यामुळे गोव्यात ऑपरेशन लोटस राबवण्याची चिन्हे दिसत आहेत.

गोव्यामध्ये उद्या (11 जुलै) पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर गोव्यात सर्वात मोठी राजकीय घडमोड असल्याचे मानले जाते आहे. गोवा काँग्रेसचे प्राभारी दिनेश गुंडु राव यांना काँग्रेसचे आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळताच त्यांनी आमदारांचे मन वळवण्याचे प्रयत्न सुरू केले. परंतु, काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते मायकल लोबो आणि अन्य नऊ काँग्रेसचे आमदार एकूण दहा जण भाजपमध्ये विलीन करण्यासंदर्भात ठाम असल्याची माहिती  मिळाली.

गोव्यात 2019 पुनरावृत्ती होणार आहे. 2019 मध्ये बाबू कवळेकर हे विरोधी पक्ष नेते असताना त्यांनी नऊ आमदार भाजपसोबत गेले होते. यावेळी मायकल लोबो यांच्यासबोत भाजपचे प्रवेश करणाऱ्या आमदारात काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचाही समावेश आहे. यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना राज्यसभेत पाठवण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गोवा फॉरवर्डशी युतीने काँग्रेसने निवडणूक लढवली होती.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बेस्टच्या संपाचा आज पाचवा दिवस, बेस्ट कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम

News Desk

पंतप्रधानांची मुलाखत म्हटल्यावर इतकी तर वाजणारच !

News Desk

शिवसेनेचे सर्व मंत्री भाजपला सामील, सेनेच्या आमदाराचा मंत्र्यांवर आरोप

News Desk