HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

काश्मीरमध्ये भाजपने ‘भगव्या’चा मोह सोडून ‘हिरवा’ रंग केला आपलासा 

श्रीनगर | आगामी लोकसभा निवडणुकांचा प्रचार आता ऐन रंगात आला आहे. लोकांची मने जिंकण्यासाठी राजकीय पक्ष काय करतील याचा काहीच अंदाज व्यक्त केला जाऊ शकत नाही. भाजप-शिवसेनेकडून मतांच्या गणितासाठी कायमच हिंदुत्त्व आणि भगव्याचा आधार घेतला गेला आहे. मात्र, आता काश्मीरमध्ये भाजपने भगव्याचा मोह सोडून हिरवा रंग आपलासा केला आहे. श्रीनगरमधील एका भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी छापण्यात आलेल्या बॅनरवर भगव्या रंगाऐवजी हिरव्या रंगाचा वापर केला आहे.

भाजपचे श्रीनगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार शेखर खालिद जहाँगिर यांच्या प्रचारासाठी भाजपने लावलेल्या बॅनरवर पूर्णतः हिरव्या रंगाचा वापर आहे. या बॅनरवर पंतप्रधान मोदींचा फोटो लावण्यात आला असून त्यावरील संदेश देखील उर्दू भाषेत लिहिण्यात आला आहे. काश्मीरमधील लोकांची मने जिंकून घेण्यासाठी भाजपकडून हा प्रयत्न करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. विशेष म्हणजे भाजपने प्रचारासाठी प्रथमच अशा प्रकारचा प्रयोग केला आहे.

“भाजपच्या झेंड्यात हिरवा आणि भगवा असे दोन्हीही रंग आहेत. हिरवा रंग हे शांती आणि प्रगतीचे प्रतिक आहे. भाजप पक्ष रंगांवर विश्वास ठेवत नाही. सबका साथ सबका विकास हेच भाजपचे ध्येय आहे”, असे स्पष्टीकरण जम्मू-काश्मीरमधील भाजपचे प्रवक्ते अल्ताफ ठाकूर यांनी दिले आहे.

Related posts

शिवस्मारक हे पहिल्या दिवसापासून वादाच्या भोवऱ्यात !

News Desk

अशोक चव्हाण २ मे रोजी नाणारच्या दौ-यावर

News Desk

शहीद जवानांच्या नावे मते मागितल्यामुळे मोदींविरुद्धच्या तक्रारीची आयोगाकडून दाखल

News Desk