भोपाळ | मध्य प्रदेशमधील सेंधवा जिल्ह्यातील बलवाडी भाजप मंडळाचे अध्यक्ष मनोज ठाकरे यांची दगडाने ठेचून अत्यंत निर्घृण हत्त्या करण्यात आली आहे. त्यांचा मृतदेह बलवाडी-सेंधवा महामार्गावर सापडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मनोज ठाकरे हे रविवारी (२० जानेवारी) मॉर्निंग वॉकसाठी घरातून बाहेर पडले होते. याचवेळी दगडाने ठेचून त्यांची हत्या करण्यात आल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यांच्या मृतदेहाजवळ रक्ताने माखलेला दगड देखील सापडला आहे.
Balwadi (Barwani) ASP on BJP leader Manoj Thackeray found dead in a field: He had gone for his routine morning walk. A blood-stained rock has been found from the crime site. Speculation is that he was killed with that rock. Investigation is being done. #MadhyaPradesh pic.twitter.com/eSACofdhfN
— ANI (@ANI) January 20, 2019
जेथे मनोज ठाकरे यांचा मृतदेह सापडला तो भाग वारला पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. मनोज ठाकरे यांची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे. यापूर्वी शुक्रवारी (१८ जानेवारी) मध्य प्रदेशातील मंदसौर नगरपालिकेचे अध्यक्ष आणि भाजपचे नेते प्रल्हाद बंधवार यांची भर रस्त्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यांच्या हत्येच्या आरोपाखाली पोलिसांनी मनीष बैरागीला अटक केली आहे जो स्वतः एक भाजप कार्यकर्ता आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.