HW News Marathi
राजकारण

पुण्यात राष्ट्रवादीचे अनोखे आंदोलन; बनावटी राज्यपालांचे फेडले धोतर

मुंबई | छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातील शिवप्रेमींनी विरोध प्रदर्शन आणि निषेध केला जात आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) वतीने आज (21 नोव्हेंबर) राज्यपालांविरोधात आंदोलन केले होते. यावेळी राष्ट्रवादीने बनावटी राज्यपालांना घेऊन आंदोलन केली. या आंदोलनादरम्यान राष्ट्रवादच्या कार्यकर्त्यांनी बनावटी राज्यपालांचे धोतर फोडले. पुण्यातील सारसबाग परिसरातील वीर सावरकर यांच्या पुतळ्यासमोर राष्ट्रवादीने आंदोलन केले.

यावेळी आंदोलन सुरू असताना बनावटी राज्यपालांची वेशभूषा परिधान केलेली एक व्यक्ती त्या ठिकाणी येते. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह कार्यकर्त्यांनी बनावटी राज्यपालांचे धोतर फेडले. राष्ट्रवादीने वेगळ्या पद्धतीने राज्यपालांच्या विधानाचे निषेध केला. ‘भगतसिंग कोश्यारी हाय हाय’, ‘केंद्राची लाचारी पत्कारणाऱ्या भाजपवाल्याचे करायचे काय?’, ‘छत्रपतींपेक्षा मोठे समजणाऱ्या अमित शहांचे करायचे का?’, ‘देवेंद्र फडणवीसांच्या लाचारीचे कारयचे काय?’, ‘काली टोपी हटाव, महाराष्ट्र बचाव’, अशा घोषणाबाजी करत राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध केला.

राष्ट्रवादीच्या आंदोलनादरम्यान राष्ट्रवादीचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, “महाराष्ट्राचे दैवस असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपालांनी केलेल्या वक्तव्य हे अत्यंत घाणेरडे होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील शिवप्रेमींची भावना लक्षात घेऊन राज्यपालांना हटवण्याची केंद्र सरकारकडे मागणी करावी, नाही तर राज्यपाल ज्या ठिकाणी भेटतील. त्या ठिकाणी त्यांचे धोतर शिवप्रेमी फेडतील”, अशा इशारा त्यांनी दिली.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आम्ही दुष्काळाचा सामना करण्यास तयार !

News Desk

“मी फिक्स मॅच पाहात नाही”, देवेंद्र फडणवीसंचा उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवर टोला

Chetan Kirdat

जय हिंदऐवजी ‘भारत तेरे तुकडे होंगे’ घोषणा देणाऱ्यांबद्दल काँग्रेसला सहानुभूती !

News Desk