HW News Marathi
राजकारण

शिवसेनेला मोठा धक्का! ठाण्यातील ६६ नगरसेवक शिंदे गटात सामील

मुंबई | शिवसेनेसोबत बंड करत एकना शिंदेंनी भाजपशी हात मिळवणी केली. आणि राज्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदी विराजमान झाले आहे. यानंतर ठाण्यात ठाण्याचे माजी महापौरनरेश म्हस्के यांनी शिवसेनेच्या पदाचा राजीना दिला. यानंतर म्हस्केसह ६६ नगरसेवकांनी काल (६ जुलै) सायंकाळी एकनाथ शिंदेंची भेट घेऊन त्यांच्या गटात सामील झाले आहे. यामुळे उद्धव ठाकरेंच्या गटाला मोठा धक्का बसल्याचे मानले जाते. कारण येत्या काळातील ठाणे आणि कल्याण-डोबिंवली महानगर पालिकेच्या दृष्टीने हे मोठे पाऊस असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

ठाणे हा शिवसेनेचा बाल्लेकिल्ला मानला जातो. यापूर्वी धर्मवीर आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांच्यामुळे शिवसेनेचा बाल्लेकिल्ला शाबुत होता. परंतु, शिंदे त्यांच्यासोबत असलेले ४० आमदार हीच खऱी शिवसेना असल्याचा दावा ते वारंवार करत आहे. येत्या काळा अजन किती आमदार शिंदे गटात सामील होती. याकडे सर्वांचे लक्ष लागेल असून यामुळे आगामी पालिक निवडणुकीत शिवसेनेला भाजप,मनसे या पक्षासोबतच त्यांच्या पक्षातील लोकांचा म्हणजे शिंदे गटाचा सामना करावा लागेल.  यामुळे आगामी पालिका निवडणूक ही अस्तित्वाची लढाई मानली जात आहे.

ठाणे महापालिकेत शिवसेनेचे ६७ नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस ३४, भाजप २३, काँग्रेस ३, एमआयएम २ एवढे नगरसेवकर आहे. ठाणे पालिकेचा कार्यकाळ संपला आहे. याठिकाणी प्रशासकीय नियुक्ती करण्यात आली आङे. आगामी महिन्यात ठाणे महापालिकेची निवडणुक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भास्कर जाधवांचा राजीनामा घेण्यासाठी विधानसभा अध्यक्ष मोटारसायकलवरून दाखल

News Desk

द्रौपदी मुर्मू पहिल्या आदिवासी आणि दुसऱ्या महिला राष्ट्रपती पदी विराजमान

Aprna

कुमारस्वामींच्या शपथविधी सोहळ्याला विरोधक एकवटणार

News Desk