नवी दिल्ली | ”पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुस्लिम समुदायाला आकर्षित करण्यासाठी बोहरा समाजाकडे गेले होते. परंतु 2019 सालच्या सार्वत्रिक निवडुकांमध्ये त्यांची अवस्था ना घर का ना घाट का,धोबी का कुत्ता अशी होईल. शेवटी ते ना इथले राहतील नाही तिथले. ”, असे अत्यंत वादग्रस्त वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजिद मेमन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात केले आहे.
काही दिवसांपूर्वी इंदूरमध्ये पंतप्रधान मोदी बोहरा मुस्लिम समाजाच्या कार्यक्रमात उपस्थित राहिले होते. यावेळी ‘शांततामय सहजीवनाचा संदेश याच समाजाने जगभर नेला आहे’ असे म्हणत मोदींनी या समाजाची प्रशंसादेखील केली होती.
सध्या प्रत्येक राजकीय पक्षात 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकांची जोरदार तयारी सुरू झालेली आहे. त्यामुळे आता या राजकीय पक्षांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप आणि टिकांच्या फैरी झडत राहतील. गेल्या काही काळात विरोधकांकडून केवळ मोदी सरकारवरच नव्हे तर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील अत्यंत टोकाची टीका होताना दिसत आहे.
याआधी पंतप्रधान मोदींवरील लघुपट जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दाखविण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शवित मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी मोदींबद्दल अत्यंत वादग्रस्त असे विधान केले होते. “मोदींसारख्या अशिक्षित आणि अडाणी व्यक्तीच्या आयुष्यावर बनवण्यात आलेला लघुपट पाहून मुलं काय शिकणार?” अशा शब्दात निरुपम यांनी मोदींवर निशाणा साधला होता. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजिद मेनन यांनीही मोदींबद्दल वादग्रस्त विधान केले आहे.
#WATCH NCP's Majeed Menon makes a crude remark on PM Narendra Modi says, "Modi ji, Bohra samaj ke pass gaye iss vichaar se ki shayad musalmano ko rijhha liya jaayega, lekin na woh idhar ke rahenge na hi udhar ke, dhobi ke kutte wali baat ho jati hai." pic.twitter.com/5lDrby0WWD
— ANI (@ANI) September 17, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.