मुंबई | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे गेल्या काही दिवसांपासून जामिनावर तुरुंगाबाहेर आहेत. जवळपास 2 वर्षांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यानंतर बाहेर आलेल्या छगन भुजबळांना भेटण्यासाठी अनेक राजकीय नेते तसेच भुजबळांचे कार्यकर्ते मुंबईत येत आहेत. भुजबळांच्या तबियतीची विचारपूस करायला नाशिकचे कार्यकर्ते आले होते. तेव्हा भुजबळ म्हणाले उद्याच्या पुण्यातल्या हल्लाबोलसाठी निघालो आहे, तिथे ट्रायल घेतो आणि मग तुम्हांला भेटायला नाशिकला येतो.
रविवारच्या पुण्यातल्या हल्लाबोल नंतर नाशिकला येणार असल्याचे आश्वासन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी नाशिकरांना दिले आहे. नाशिकच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी सकाळी मुंबईत भुजबळ यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आहे. त्यावेळी कार्यकर्त्यांनी नाशिकला कधी येणार? असा प्रश्न त्यांना विचारला होता. तेव्हा उद्या पुण्याची ट्रायल घेतो आणि मग नाशिकला येतो असे भुजबळ म्हणालेत.
रविवार 10 जून रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसची पुण्यात सभा होत आहे. या सभेला भुजबळांनी उपस्थित रहावे यासाठी पक्षाच्या नेत्यांकडून आग्रह करण्यात आला होता तसेच न्यायालयानेही त्यांना सभेला उपस्थित रहाण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे रविवारच्या पुण्याच्या सभेत भुजबळ उपस्थित असणार आहेत. मात्र कार्यकर्त्यांच्या हट्टासाठी आणि नाशिककरांच्या प्रेमापोटी भुजबळ नाशिकला भेट देणार का हे पहाण येत्या काळात महत्वाचं ठरणार आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.