HW News Marathi
राजकारण

जातीयवाद वाढविण्यात मुख्यमंत्र्यांना यश

मुंबईः भीमा कोरेगाव प्रकरणामध्ये दंगल घडू नये, ही घटनात्मक जबाबदारी पार पडण्यात गृहमंत्रिपदाची धुरा असलेले मुख्यमंत्री अपयशी ठरले. मात्र, दोन समाजात तेढ वाढविण्याच्या राजकीय जबाबदारीमध्ये मुख्यमंत्र्यांना यश आले, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मंगळवारी टीका केली.

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रात जाती तेढ निर्माण झाला. ही घटना भीमा-कोरेगाव येथे स्तंभाला २०० वर्षे पुर्ण झाले असून या अभिवादंन करण्यासाठी गेलेल्या बौध्द अनुयायांच्या गाड्यांवर काही समाज कंठकाकडून दगड-फेक करण्यात आली. यात अनेक अनुयांयी जखमी झाले होते. तसेच सर्व परिसरात अशांतता पसरली होती. या घटनेनंतर अफवांचे वादळ सर्वत्र फिरू लागले होते. या अशांततेचा फायदा दलित संघटनेच्या नेते मंडळीनी बौध्द अनुयांयी आपल्याकडे लक्ष्यवेधण्यासाठी बंद पुकारून बौध्द जनतेला तुमचा एकमेव नेता असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला होता. या दलित संघटनेच्या नेत्यांचा हा प्रयत्न बहुतांश यशस्वी झालेला आपण पाहिला.

या घटनेचे तीव्र पडसात महाराष्ट्रात दंगलीच्या स्वरुपात आपण पाहिले. या दंगलीमध्ये ग्रामीण भागात ठिक-ठिकाणी दुकाने बळजबरीने बंद करण्यात आली. मुंबईमधील काही भागात रास्ता रोको, ट्रेन रोको करण्यात आला. यामुळे कधी ही न थांबणारी मुंबई देखील थांबली. नवीन वर्षाची सुरुवाती जातीय दंगलीने होईल असा आपण विचार देखील केला नव्हता. पण दंगलीमध्ये नाहकपणे सामान्य जनता भरडली गेली. या दंगलीत कायदा सुव्यवस्था राहखण्यात राज्य सरकार अपयश ठरल्याची टीक सर्वत्र राजकीय वर्तुळात होऊ लागली.

पेशवा यांच्या विरोधात ब्रिटिशांच्या बाजूने महार बटालियन पेशवांचा परावभव केला. महार यांच्या कार्याच्या स्मरणार्थ भीमा-कोरेगाव नदी काठी येथे ब्रिटिशांनी विजयस्तंभ उभारण्यात आला. या स्तंभावर या सैनिकांचे नावे लिहली गेली आहेत. गेली अनेक वर्षापासून बौध्द अनुयायी नवीन वर्षाच्या सुरुवातीला या स्तंभाला भेट देऊन अभिवादंन करत. यंदा २०० वर्षेपुर्ण झाल्यामुळे मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी या ठिकाणी गेले होते.

या घटनेचे पडसात महाराष्ट्र पुरतेच मर्यादीत नसून संपुर्ण देशात झाल्याचे दिसून आले. या घटनेचा निषेध म्हणून गुरजातमध्ये देखील रॅली काढण्यात आली. या घटने मोठे वळण घेण्या आधी थांबविणे शक्य झाले असेत. पण राज्य सरकार या जातीय तेढ न थांबविता हा तेढ वाढण्यासाठी वाट पाहत असल्याचे दिसून आले.

या कारणामुळे मुख्यमंत्र्यांवर सर्व बाजून टीकेची झोड उटली. ‘मुख्यमंत्र्यांनी दोन समाजात जातीय तेढ वाढविण्यास मदत केली असल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले.’

या दंगलीसाठी आंबेडकरी अनुयायांनी हिंदू संघटनेचे नेते संभाजी एकबोटे, भिडे गुरुजी यांना जवाबदार यांना दोषी ठरविली. या दोघांवर कायदेशीर कारवाईची मागणी सरकारकडे करण्यात आली. या प्रकरणात चौकशी करत असून दोषींवर योग्य करावाई करण्याचे आश्वासन सरकारने आंबेडकरी जनतेला देण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संभाजीनगर नव्हे ‘छत्रपती संभाजीनगर’; औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामकरणास शिंदेंची मान्यता

Manasi Devkar

उद्या आम्ही अधिकृत कॅबिनेट करून नामांतराच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करणार! – मुख्यमंत्री

Aprna

उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब घेतले विठ्ठल-रखुमाईचे दर्शन

News Desk