HW Marathi
राजकारण विधानसभा निवडणूक २०१९

भारत माझा देश आहे… बांगलादेशी आणि पाकिस्तानी घोसखोरांचा नाही !

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ९ फेब्रुवारी रोजी देशातील बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात मोर्चा आयोजित केला आहे. मनसेकडून आता या मोर्चासाठी जोरदार तयारीला सुरुवात झाली आहे. याच मोर्चासाठी, आता मनसेकडून सोशल मीडियावर एक टिझर व्हायरल करण्यात आला आहे. “ही लढाई आहे मोहल्ल्यांमधून भारतविरोधी कारवाया करणाऱ्यांच्या विरोधातली”, अशा मजकुराने मनसेच्या या टीझरची सुरूवात होते आहे. “भारत माझा देश आहे. बांगलादेशी आणि पाकिस्तानी घोसखोरांचा नाही. त्यांना या देशातून हाकललंच पाहिजे”, अशी जोरदार मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. मनसेच्या या मोर्चाकडे सध्या संपूर्ण राज्याचे लक्ष आहे.

मनसेच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून हा टिझर रिलीज करण्यात आला आहे. या टिझरला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घुसखोरांच्या विरोधातील भाषणाच्या मुद्द्यांचा देखील वापर करण्यात आला आहे. “ही लढाई आहे… मोहल्ल्यांमधून भारतविरोधी कारवाया करणाऱ्यांच्या विरोधातली, ही लढाई आहे…देश पोखरून टाकणाऱ्या वाळवीविरोधात आहे”, असा मजकूर या टीझरमध्ये आहे. “अजून किती काळ गाफील राहणार ?”, असा सवाल देखील मनसेने यावेळी उपस्थित केला आहे. येत्या ९ फेब्रुवारीला देशातील पाकिस्तानी आणि बांग्लादेशींना समर्थन देणाऱ्यांच्या विरोधात मनसे मोर्चा काढणार असल्याची माहिती राज ठाकरेंनी गुरुवारी (२३ जानेवारी) पक्षाच्या पहिल्या अधिवेशनातील भाषणादरम्यान दिली होती. यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या.

९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मनसेच्या या मोर्चाचा मार्ग मुंबईतील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानापासून (भायखळा) आझाद मैदानापर्यंत ठरवण्यात आला होता. मात्र, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी राणी बाग ते आझाद मैदान या मार्गाचा वापर न करण्याची सूचना पोलिसांनी सोमवारी (३ फेब्रुवारी) मनसे नेत्यांना केली होती. त्यामुळे गिरगाव चौपाटी, हिंदू जिमखाना ते आझाद मैदान या मार्गाचा वापर करण्यास परवानगी दिल्याची माहिती मनसे नेते मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली. यानंतर मनसेकडून या नव्या मार्गाचे पोस्टरही प्रसिद्ध करण्यात आले.

Related posts

काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट ६ महिन्यांसाठी वाढवावी | शहा

News Desk

…तर तुम्हाला पावसात सभा घेण्याची वेळ आली नसती !

News Desk

अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाला जनादेश मिळाला आहे !

News Desk