नवी दिल्ली | गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृतीची विचारपूर करण्यासाठी आज (३१ जानेवारी) भारतीय लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी त्यांची भेट घेतली. लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी विधानसभा परिसरात पर्रीकर यांची भेट घेतली. यावेळी “मी पर्रीकर यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी येथे आलो होतो”, असे लष्करप्रमुखांनी स्पष्ट केले. दरम्यान, याआधी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील पर्रीकरांची भेट घेतली होती. या भेटीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.
Panaji: Army Chief General Bipin Rawat leaves after meeting Goa Chief Minister Manohar Parrikar. General Rawat says, "I had just come to check on him, how is his health, how is he feeling." pic.twitter.com/lPbXEwKFrP
— ANI (@ANI) January 31, 2019
राहुल गांधी यांनी मंगळवारी (२९ जानेवारी) पर्वरी येथील विधानसभा प्रकल्पाच्या ठिकाणी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घेतली. राहुल गांधी यांनी पर्रीकरांच्या केबिनमध्ये जाऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. “तुम्ही इतके आजारी असूनही कसे काय काम करता”, असा प्रश्न राहुल गांधी यांनी यावेळी विचारला. “माझा स्वभावच तसा आहे. त्यानुसारच मी काम करतो”, असे उत्तर पर्रीकर यांनी दिले होते.
राहुल गांधींना पर्रीकरांनी सुनावले
राहुल आणि पर्रीकरांच्या भेटीनंतर “माझ्या कार्यालयात आपल्या भेटीचा मीडिया अहवाल वाचल्यानंतर मला त्रास झाला. आपण हा दौरा अल्प राजकीय फायद्यासाठी वापरला आहे असे मला वाटते”, असे म्हणत मनोहर पर्रीकर यांनी एका पत्राद्वारे राहुल गांधींना सुनावले.
उत्तर देताना राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
“पर्रिकरजींच्या परिस्थितीबाबत मला प्रचंड सहानभूती आहे. आमच्या गोव्यातील भेटीनंतर पंतप्रधान मोदींनी त्यांच्यावर आणलेल्या प्रचंड दबावामुळे त्यांनी माझ्यावर टीका केली. या टीकेतून पर्रीकरांची निष्ठा दिसली”, असे म्हणत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांच्या पत्राला उत्तर देताना पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.