HW News Marathi
राजकारण

अप्रत्यक्षपणे मोदींच्या हातात काश्मीर

नवी दिल्ली | भाजपने मंगळवारी अचानक पाठिंबा काढल्यामुळे जम्मू आणि काश्मीरमध्ये सरकार कोसळले.परंतु राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कश्मीरमध्ये राज्यपाल राजवटीला मंजूरी दिल्यामुळे राज्यपाल राजवटीच्या माध्यमातून जम्मू आणि काश्मीरची सत्ता अप्रत्यक्षपणे मोदींच्या हातात आली आहे.

भाजपने पाठिंबा काढल्यानंतर पीडीपी पक्षाच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर राज्यपालांच्या सल्ल्याने राष्ट्रपतींनी जम्मू काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू केली.

2019 च्या निवडणुका लक्षात घेऊन भाजपने ही खेळी खेळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे. मात्र आता अप्रत्यक्षपणे जम्मू-काश्मीरची सत्ता भाजपच्या हातात आल्याने राज्यात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिल्लीत काँग्रेस आपसाठी ४ जागा सोडण्यास तयार, मात्र केजरीवालांनी भूमिका बदलली !

News Desk

#RamMandir : …तर दिल्लीपासून काबूलपर्यंत दंगली घडवू !

News Desk

एकनाथ खडसे यांचा भाजपला घरचा आहेर

Gauri Tilekar