HW News Marathi
देश / विदेश राजकारण

इंद्रनील राजगुरू यांनी ‘आप’ला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये केली घरवापसी

मुंबई :- गुजरात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. ही निवडणूक 1 डिसेंबर आणि 5 डिसेंबर रोजी दोन टप्प्यात होणार असल्याची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने गुरुवारी केली असून मतमोजणी आणि निकाल 8 डिसेंबर रोजी जाहीर होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर माजी आमदार इंद्रनील राजगुरू (Indranil Rajguru) यांनी ‘आप’ला सोडचिठ्ठी देत शुक्रवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. एआयसीसी गुजरातचे प्रभारी रघु शर्मा, गुजरात काँग्रेसचे प्रमुख जगदीश ठाकोर, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते सुखराम राठव आणि इतर वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत राजगुरू यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

पक्षप्रवेश करताच इंद्रनील राजगुरू यांनी ‘आप’ पक्षावर गंभीर आरोप केले आहेत.  ते म्हणाले, “अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील संघटना राज्यात भाजपची ‘बी-टीम’ म्हणून काम करत आहे.” या वर्षी एप्रिलमध्ये काँग्रेस सोडल्यानंतर आम आदमी पार्टी (आप) मध्ये सामील झालेले राजगुरू गुजरातमध्ये भाजपला पराभूत करण्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय असल्याचे सांगत काँग्रेस पक्षात परतले. ‘आप’चा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा न बनवल्याने ते नाराज असल्याचे राजकीय वर्तुळात म्हटलं जात आहे. काही दिवसांपूर्वी केजरीवालांनी सुरतमध्ये पत्रकार परिषद घेऊन ‘कोण असेल आपचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार?’ या मोहिमेचे उद्घाटन केले होते. तर काल (४ नोव्हेंबर ) रोजी आपचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी इसुदान गढवी (Isudan Gadhvi) यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची घोषणा केली.

कोण आहेत इंद्रनील राजगुरू?

राजगुरू 2012 मध्ये राजकोट-पूर्व जागेवरून काँग्रेसचे आमदार म्हणून विजयी झाले होते. 2017 मध्ये त्यांनी राजकोट-पश्चिम जागेवरून तत्कालीन मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढण्यासाठी आपली जागा सोडण्याचा निर्णय घेतला. पण रुपानी यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. 2018 मध्ये, राजगुरू यांनी पक्ष संघटनेच्या कामकाजावर नाराज असल्याचा दावा करून काँग्रेसचा राजीनामा दिला. निवडणुकीदरम्यान पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या कार्यकर्त्यांना शिक्षा होण्याऐवजी बढती देण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला होता. राजगुरू 2019 मध्ये पुन्हा काँग्रेसमध्ये सामील झाले होते. एप्रिल 2022 मध्ये पुन्हा आपमध्ये सामील होण्यासाठी त्यांनी काँग्रेसला राम-राम केले होते. परंतु, आता परत एकदा त्यांनी काँग्रेसमध्ये घरवापसी केली आहे.

तर दुसरीकडे ‘आप’ने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा असलेल्या इसुदान गढवी यांना सर्वेमध्ये 73 टक्के मतं मिळाली. गढवी यांनी जूनमध्ये पत्रकारितेला रामराम करत राजकारणात प्रवेश केला. इसुदान गढवी हे गुजरातमधील इटालिया समाजातून आहेत. इसुदान गढवी यांना गुजरातमध्ये शेतकरी नेता म्हणून ओळखले जाते. गढवी यांचा जन्म 10 जानेवारी 1982 रोजी गुजरातमधील जामनगर जिल्ह्यातील पिपलिया गावमध्ये एका शेतकरी कुटुंबात झाला आहे. यानंतर गढवी यांनी महात्मा गांधी यांनी स्थापन केलेल्या अहमदाबादच्या गुजरात विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतले. यानंतर गढवींनी पत्रकारितेत आपले करिअर केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपने ईडीची भीती दाखविल्यानेच शिवसेना युतीसाठी तयार !

News Desk

भीक नव्हे तर जनतेने जिव्हाळ्याने केलेली मदत !

News Desk

जितेंद्र आव्हाडांनी ‘त्या’ वादग्रस्तवर दिले स्पष्टीकरण

swarit