HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर राहुल गांधींचा राजीनाम्याचा प्रस्ताव ?

नवी दिल्ली | यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत मिळवत मोदी सरकारने देशातील आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केलेले आहे. काँग्रेससाठी मात्र हा अत्यंत मोठा धक्का मानला जात आहे. याच पार्श्वभूमीवर, लोकसभेतील आपल्या दारुण पराभवानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी यांनी आपल्या पदाच्या राजीनाम्याचा प्रस्ताव मांडला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.  या निवडणुकांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे.

युपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राहुल गांधींनी दिलेला राजीनाम्याचा प्रस्ताव रद्द केला असल्याची माहिती मिळत आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा मोदी सरकारला ऐतिहासिक विजय मिळाला आहे. तर काँग्रेसला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकांमधील पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे. राहुल गांधी यांनी निकालांनंतर आज (२३ मे) पत्रकार परिषद घेऊन आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

भाजपच्या विजयाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपचे अभिनंदन देखील केले आहे. “आमच्या प्रचारादरम्यान जनता मालक आमची मालक आहे, असे म्हटले होते. जनतेने आता स्पष्टपणे निकालांमध्ये आपला कौल दिला आहे. मी पंतप्रधान मोदी आणि भाजपचे अभिनंदन करतो.” असे राहुल गांधी म्हटले आहे. त्याचप्रमाणे अमेठी मतदारसंघातील आपल्या प्रतिस्पर्धी आणि भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी यांना देखील राहुल गांधी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Related posts

सर्व विरोधी पक्षांचा ईव्हीएमविरोधात २१ ऑगस्टला मोर्चा

News Desk

अरुण गवळीला हवी २८ दिवसांची संचित रजा

News Desk

धनगर आरक्षणाच्या आंदोलकांची प्रकृती खालावली

News Desk