HW News Marathi
राजकारण

पक्षांतर्गत वाद टाळण्यासाठी शिवसेनेने नाकारले उपमुख्यमंत्रीपद ?

मुंबई | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (१४ जून) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेऊन राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा केली आहे. दरम्यान, या चर्चेनंतर उद्धव ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्रीपद नाकारले आहे. शिवसेनेतील अंतर्गत वाद टाळण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री नाकारल्याचे माहिती मिळत सूत्रांकडून मिळत आहे. दरम्यान, राज्याच्या या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद मिळेल अशी जोरदार चर्चा होती. मात्र, पक्षांतर्गत वाद टाळण्यासाठी उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री नाकारल्याचे माहिती मिळत आहे.

खरंतर, भाजपकडून शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद किंवा दोन मंत्रीपदांची ऑफर देण्यात आली होती. या पार्श्वभूमीर शिवसेनेकडून उपमुख्यमंत्री पदासाठी सुभाष देसाईं यांचे नाव पुढे येताना दिसत असले तरीही शिवसेनेतील अनेक नेत्यांचा त्यांच्या नावाला पाठिंबा नसल्याचे समजत आहे. दरम्यान, दुसरीकडे आदित्य ठाकरे यांनी यंदाची विधानसभा लढवावी, तसा आग्रहच पक्षाच्या आमदारांकडून केला जात असला तरी १३ जून रोजी ‘मातोश्री’वर झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान आदित्य ठाकरे यांनी देखील निवडणूक लढविण्याबाबतच्या प्रश्नावर उत्तर देणे टाळले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“अडीच वर्षांपूर्वी शिवसेना-भाजपा युतीचे…” मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली खंत

Aprna

मोदींच्या भेटीपासून तृप्ती देसाईंना रोखले

News Desk

नव्या वर्षांत घरांच्या किंमतीत वाढ ?

News Desk