मुंबई | विधानसभेचे विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस यांनी काल राज्याचे राज्यपल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीनंतर राज्यात राजकीय घडामोडींना कमालीचा वेग आला आहे. यानंतर राज्यपालांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विश्वासदर्शक ठराव सिद्ध करण्यासाठी पत्र पाठविल्याची माहिती माध्यमांमध्ये प्रसारित होत आहे. यानुसार, महाविकास आघाडी सरकारला उद्या (30 जून) सायकाळी 5 वजाता विश्वासदर्शक ठरावाला सामना करावा लागणार आहे.
राज्यात शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे त्यांच्यासह 40 आमदारांनी पक्षविरोधा बंडखोरी केली आहे. सध्या शिंदे गट हा गुवाहाटीमध्ये मुक्कामी आहे. शिंदे गट हे आज (29 जून) गुवाहाटीवरून गोव्याच्या दिशेने आगेकूच करणार असून तेथून मुंबईला येणार असल्याची माहिती माध्यमांमध्ये प्रसारित होत आहे. शिंदे गटने बंड पुकारून 9 दिवस झाले असून या बंडानंतर राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे.
We’ve given a letter to Mahrashtra Gov & told him that the 39 Shiv Sena MLAs are saying that they don’t want to be with NCP,Cong govt; it shows MVA govt has lost the majority. We’ve requested Gov to direct CM to immediately prove his majority through Floor test: Devendra Fadnavis pic.twitter.com/AfeRr9HjVI
— ANI (@ANI) June 28, 2022
फडणवीसांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “बंडखोर आमदारांनी राज्यपालांना ई-मेलद्वारे पत्र पाठविले आहे. शिवसेनेच्या 39 बंडखोर आमदारांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत राहायचे नाही, अशी भूमिका त्यांनी गेतली आहे. यामुळे आता महविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्याची मागणी त्यांनी राज्यपालांकडे केले आहे.”
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.