HW News Marathi
राजकारण

‘धनुष्यबाण’ चिन्हावर तातडीने निर्णय घेण्याची शिंदे गटाची याचिका; सुनावणी लांबणीवर पडण्याची शक्यता

मुंबई | शिवसेनेते उभी फुटी पडल्यानंतर शिवसेना आणि धनुष्यबाण कोणाचा यावसंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगात (Central Election Commission) आज होणार फैसला लांबणीवर पडला आहे. यात मुंबईतील अंधेरी पूर्व मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. या पोटनिवडणुकीचा अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात झाली आहे. या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या चिन्हावर ठाकरे गटाने उमेदवारी दाखल करीत आहेत. यामुळे निवडणूक आयोगाने चिन्हासंदर्भात तातडीने सुनावणी घेण्याची मागणी करणारी याचिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली आहे. परंतु, निवडणूक आयोगासमोर धनुष्यबाण चिन्हासंदर्भात निर्णय लांबणीवर पडणार असल्यामुळे आज निर्णय येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

निवडणूक आयोग धनुष्बाण चिन्ह दोन्ही पैकी एका गटाला मिळेल किंवा गोठावल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. परंतु, यासंदर्भातील निर्णय निवडणूक आयोगाने निर्णय लांबवणीवर पडला आहे. कारण ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे एकही कागद सादर केला नाही, असा दावा शिंदे गटाने आयोगाकडे केला आहे. ठाकरे गट आज दुपारी कागदपत्रे आयोगाकडे सादर करून आपले प्राथमिक उत्तर निवडणूक आयोगात दाखल करेल. कागदपत्रे सादर करण्यासाठी शिवसेनेला आज शेवटची तारीख आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई आणि वकिलांची टीम दिल्लीत दाखल झालेली आहे.  अंधेरी पूर्व  पोटनिवडणुकीची अर्ज भरण्यासाठी आजपासून सुरू झाली असून 14 ऑक्टोबर ही शेवटची तारीख आहे. यामुळे धनुष्यबाण या चिन्हाचे नेमके काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, आम्हीच शिवसेना आणि आमच्या बाजूने विधिमंडळ पक्ष सदस्यांपैकी दोन तृतीयांश सदर आहे. शिंदे गटाने पदाधिकारी व कार्यकर्त्यांची सुमारे दीड लाख प्रतिज्ञापत्रे सादर केली आहेत. तर शिंदे गटाने याचिकेत त्यांच्याकडे पक्षाच्या प्राथमिक सदस्यांचा पाठिंबा नाही.  निवडणूक आयोगाने पुरेशी कागदपत्रे सादर करण्यासंदर्भात नोटीस पाठवूनही ठाकरे गट मुदत वाढ मागत आहेत. शिवसेनेच्या 19 पैकी 12 खासदार तर 55 पैकी 40 आमदारांचा आम्हला पाठिंबा आहे. तसेच 36 लाख 57 हजार 327 कार्यकारी सदस्य आणि 31 हजार 291 प्राथमिक सदस्यांची शपथपत्र निवडणूक आयोगाकडे सादर केले आहे.

 

संबंधित बातम्या

शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ चिन्ह कुणाचे यावर निवडणूक आयोगात होणार फैसला

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अंतर्गत चर्चा करून राऊतांनी वक्तव्य केले असेल!

Aprna

शेतकऱ्यांना लवकर कर्ज मिळावे, मुख्यमंत्र्यांचे केंद्राला पत्र

News Desk

1767 कोटींची जमीन मुख्यमंत्र्यांनी 3 कोटीत विकली | काँग्रेस

swarit