HW News Marathi
राजकारण

जयंत पाटील यांच्या स्वागताला हजारो कार्यकर्ते रस्त्यावर! नियम तोडले म्हणून मंत्र्यांवर गुन्हे दाखल करणार का?

बीड | परळी मतदार संघात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने परिवार संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम परळी येथिल हालगे गार्डन येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमास तुफान गर्दी पहावयास मिळाली.

राज्याचे सामजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या मतदार संघात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंधारण मंत्री जयंत पाटील यांच्या स्वागताला संपूर्ण परळी मतदार संघ दिवाळी प्रमाणे सजवण्या आला होताजागोजागी स्वागताचे बॅनर, चौकाचौकात जयंत पाटील यांचे 45 फुटी कट आऊट लावण्यात आले होते.

ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना कोरोनाचे नियम का लागू नाहीत?

चौकाचौकात डीजे सह बँड ढोल तासे वाजवण्यात आले तर अतिषबाजीने संपूर्ण परिसर चमकून निघाला होता.

यावेळी परळी मतदार संघातील हजारोच्या संख्येने कार्यकर्ते रस्त्यावर गर्दी करून डीजे च्या तालावर नाचताना दिसले तर खुद्द धनंजय मुंडे सह जयंत पाटील यांनी सुद्धा मास्क न लावताच कोरोनाच्या सर्व नियमांचे उल्लंघन करतांना दिसून आले.

किरोनाचे नियम फक्त सर्व सामान्य नागरिकांना आहेत ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना कोरोनाचे नियम का लागू नाहीत? पोलीस प्रशासन मंत्र्यांवर कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करणार का?असा सवाल सर्वसामान्य जनतेतून उठत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गोव्यात काँग्रेसला मोठी गळती! 11 पैकी 10 आमदार भाजपमध्ये जाण्याची शक्यता

Aprna

उद्धव ठाकरेंची भाजपला पहिल्यांदाच खुली ऑफर!

News Desk

पक्ष वाढवण्यासाठी सरकारचा वापर करणे हा आमचा विचारच नाही !

News Desk