HW Marathi
राजकारण

‘आम्ही नाही त्यातले’ अशी शिवसेनेची भूमिका !

मुंबई | भाजपसोबत ५० टक्के पापात सहभागी असलेली शिवसेना ‘आम्ही नाही त्यातले’ अशी भूमिका घेऊन विरोधी पक्षाची भूमिका बजावत आहे, अशी जोरदार टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भिवंडी येथील जाहीर सभेत केले.

देश आणि राज्यातील भाजप सरकार बदलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने निर्धार परिवर्तन संपर्क यात्रा राज्यभर काढण्यात येत असून नरेंद्र आणि देवेंद्र यांनी कशी फसवणूक केली याची माहिती आपण जनतेपर्यंत पोचवणार असल्याचे जयंत पाटील यावेळी म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेच्या सभेला विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, यांच्यासह येथील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Related posts

जाणून घ्या…संध्याकाळी ६ वाजेपर्यंत राज्यात अंतिम टप्प्यात झालेल्या मतदानाची टक्केवारी

News Desk

जम्मू-काश्मीर भारताचा अंतर्गत प्रश्न आहे !

News Desk

संकट आलं म्हणजे नाउमेद व्हायचं नसतं ! 

News Desk