HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

कवी कुमार विश्वास भाजपमध्ये प्रवेश करणार ?

नवी दिल्ली |  कवी कुमार विश्वास भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. कुमार विश्वास यांनी भाजपमध्ये केल्यानंतर पूर्व दिल्लीतून लोकसभा निवडणूक लढविणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. विश्वास यांनी सोमवारी (१ एप्रिल) भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांची भेट घेतली होती.

आम आदमी पार्टीचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासोबत मतभेदमुळे कुमार विश्वास भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. तसेच आपच्या विविध कार्यक्रमांतही त्यांना डावलण्यात आले. त्यानंतर आता राजस्थानच्या प्रभारीपदावरून दूर करण्यात आल्याने कुमार विश्वास आणि आपमधील दुरावा आणखीच वाढल्याचे दिसून आले.

 

 

Related posts

मोदींची वागणूक पंतप्रधानपदाच्या नैतिकतेला साजेशी असायला हवी !

News Desk

स्मृती इराणींने हत्या झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या पार्थिवाला दिला खांदा

News Desk

पुलवामा हल्ला नसून ती तर ‘दुर्घटना’

News Desk