HW News Marathi
राजकारण

व्हिडिओ पोस्ट केल्यामुळे अडचणीत आल्या किरण खेर आयोगाने पाठविले नोटीस

चंदीगड | लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुलांना घोषणा द्याला लावल्यामुळे भाजपच्या उमेदवार किरण खेर चांगल्याच अडचणीत आल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणाबद्दल किरण खेर यांना निवडणूक आयोगाने कारणे दाखवा नोटीस पाठविली असून येत्या २४ तासांत उत्तर देण्यास सांगितले आहे. आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी निवडणूक अधिकारी अनिल गर्ग यांनी ही नोटीस पाठविली आहे.

किरण खेर यांनी एक व्हिडीओ त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. यामध्ये मुले घोषणा देत आहे की, तसेच नगरसेवक मदेश इंद्र सिद्धू मुलांसोबत आहेत. वोट फॉर किरण खेर, अबकी बार मोदी सरकार, अशी घोषणा या व्हिडीओमध्ये बोलत आहेत. तर, किरण खेर यांनी ट्विटरवर लिहिले आहे की, “वोट फॉर किरण खेर, अबकी बार मोदी सरकार.. मुले देवाची रूपे असतात.” हा व्हिडिओ वादाच्या भोवऱ्यात अडकल्यानंतर किरण खेर यांना हा व्हिडिओत्यांच्या ट्वीटरवरून डिलीट केला आहे.

याप्रकरणी निवडणूक आयोगाने किरण खेर यांना नोटीस पाठविली आहे. नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड अॅक्टनुसार ही नोटीस पाठविण्यात आली आहे. या अॅक्टनुसार अधिकारी किंवा राजकीय पक्ष कोणत्याही मुलाला निवडणुकीच्या कार्यक्रमात सामील करु शकत नाही. दरम्यान, याप्रकरणी किरण खेर यांनी माफी मागितल्याचे समजते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘मविआ’ सरकारने मंजूर केलेल्या प्रस्तावाचा GR राज्यपालांनी मागवला

Aprna

डीजे वादकांना राज ठाकरेंचा पाठिंबा

News Desk

अटलबिहारी यांच्या भाचीला राजनांदगांव मतदारसंघातून उमेदवारी

swarit